Sudha Murthy : सुधा मूर्ती सांगतात जगण्याचे ८ मूळमंत्र, जे आयुष्य जगण्याचा मार्ग करतील सोपा

सुधा मूर्तींच्या पुस्तकातील हे काही विचार तुम्हाला यशस्वी जीवनाच्या वाटलाचीसाठी मदत करतील
Sudha Murthy
Sudha Murthyesakal
Updated on

Sudha Murthy : सुधा मूर्ती लेखक असण्याबरोबरच एक समाज सेविका आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आयुष्य जगण्याचा त्यांचा हटके दृष्टिकोण त्यांना इतरांपेक्षा वेगळी ओळख देतो. त्यांच्याकडून पालकांनी आणि तरुणांनी शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यांनी लिहीलेली पुस्तकं आपल्याला जगण्याचा मार्ग सांगतात. सुधा मूर्तींच्या पुस्तकातील हे काही विचार तुम्हाला यशस्वी जीवनाच्या वाटलाचीसाठी मदत करतील.

  • जीवन ही एक परीक्षाच आहे. मात्र जीवनाच्या अभ्यासक्रमाबाबत आपल्याला फारसे काही माहित नाही. जीवनात संकटे येतील, पण त्यांना सामारे जात सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.

  • आयुष्य जगताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही जगायला हवं. एका व्यवसायिकाची पत्नी आणि अनेक संस्थांच्या सह-संस्थापकपदी कार्यरत असून सुधा मूर्तीचे राहणीमान फार साधे आहे. म्हणून त्या शिकवतात की दिखाव्यापासून दूर राहा.

Sudha Murthy
Healthy Lifestyle : शंभर वर्ष जगायचंय? तेसुद्धा निरोगी, मग या पद्धतीने बनवा भाजी

नाती गरजेचीच

सुधा मूर्ती सांगतात की, आयुष्यात अवॉर्ड, डिग्री, पैसे आणि इतर गोष्टींपेक्षा मनाची शांती जास्त गरजेची आहे. यासह मनाची नाती जपावीत. संवेदनशील लोकांना खऱ्या जगाचा शोध घेण्यास इतरांपेक्षा जास्त काळ लागू शकतो.

पैशांचा लोभ कामाचा नसतो

सुधा मूर्ती यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहीले आहे की पैसे माणसं जोडत नाहीत तर त्यांना एकमेकांपासून दूर करतो.

Sudha Murthy
Success Mantra : दूरदृष्टी, परिश्रम, दृढ निश्चय हिच यशाची त्रिसूत्री

कुठल्याही गोष्टीवर एक उपाय नसू शकतो

कुठल्याही गोष्टीवर एकच उपाय नसू शकतो. फक्त तुमच्याकडे योग्य दृष्टीकोण असेल तर दुसरा मार्गही नक्कीच मिळतो.

स्वत:ला आहात तसे स्विकारण्याची क्षमता ठेवा

सुधा मूर्तींच्या मते, कुठल्याही व्यक्तीस त्यांचा स्वभाव, चांगलेपणा आणि त्यात असलेल्या त्रृटींसह त्यांना स्वीकारा.

स्वत:वर विश्वास ठेवा

सुधा मूर्ती सांगतात की, जगभरात असे अनेक लोक आहेत जे जास्त शिकलेले नाहीत. मात्र ते आयुष्यात फार यशस्वी आहेत. अर्थात स्वत:वर विश्वास असणे जास्त गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.