लेकरांना कसं सांभाळायचं? सुधा मुर्तींनी सांगितल्या 5 खास टिप्स

सुधा मुर्ती कायमच तरूणाईला आदर्श वाटतात
Sudha Murty Parenting Tips
Sudha Murty Parenting Tips esakal
Updated on

Sudha Murty Parenting Tips : सुधा मुर्ती या आजच्या तरूणाईसाठी आदर्श आहेत. त्यांची साधी राहणी-उच्च विचारसरणी अनेकांना प्रेरणादायी वाटते. महत्वाचं म्हणजे समस्या कशी सोडवायची हे सोप्या पद्धतीने त्या सांगतात. त्यामुळे कुठल्याही समस्येकडे सहजतेने कसं बघावं याचा दृष्टीकोन त्यामुळे मिळतो. त्यांनी पालकत्व कसे असावे याच्याही टिप्स दिल्या आहेत. सुधा मुर्ती (Sudha Murthy) या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांनी मुलांना (Childrens) घडविताना आधुनिकता आणि पारंपारिकता याचा मेळ साधला होता. त्यामुळे आजच्या युगातील अनेक पालकांनीही (Parents) त्यांची पालकत्वाची तंत्र आत्मसात केली आहेत. त्यांनी पालकांना मुलांना घडविण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

Sudha Murty Parenting Tips
भारताने गौरवले टांझानियाच्या किली पॉलला!
kids
kids esakal

त्यांना स्पेस द्या - नात्यात प्रत्येकालाच थोडी स्पेस हवी असते. तशीच ती मुले आणि पालक यांच्या नात्यातही हवी. पालकांनी एकमेकांच्या स्पेसचा आदर करायला हवा. याबाबत सुधा मुर्ती म्हणतात की, दोन पिढ्यांचे विचार नक्कीच वेगवेगळे असतात. त्यामुळे दोघांच्या विचार आणि मतांमध्ये संघर्ष नसावा. त्यांनाही त्यांचे निर्णय, आवडी-निवडी तसेच नापसंती असल्यास त्याविषयी पूर्नविचार करण्याची संधी मिळेल. एका मुलाखतीत मुर्ती म्हणाल्या होत्या की, जर तुम्ही केलेला पदार्थ त्यांना आवडत नसेल तर त्यांना काही काळ एकटं सोडा. तो पदार्थ खायची जबरदस्ती करू नका. असं केल्याने त्यांना कदाचित तो पदार्थ खावासा वाटेल. पण ते कधी खायचे हे त्यांचं त्यांना ठरवू द्या.

Sudha Murty Parenting Tips
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

त्यांना छोटे- मोठे निर्णय घेऊ द्या - सुधा मुर्ती यांनी पालकांना मुलांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करण्यास सांगितले आहे. . लहान मुलांना छोटे निर्णय घेण्याची संधी दिल्याने त्यांना परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होईल. शिवाय त्यांना एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे त्याचे फायदे - तोटे समजतील. जर एखाद्या मुलाला तुमचा निर्णय पटला नसेल तर त्यांना निर्णय घेण्यासाठी विविध पर्याय देऊन त्यामधून योग्य निर्णय घ्यायला शिकवा.

Sudha Murty Parenting Tips
22022022- आजची तारीख पाहिलीत का? किती वर्षांनी आलाय योग!
Family
Familyesakal

त्यांना विविध उदाहरणे द्या - मुलांना प्रत्येक गोष्टीचे पालन करण्यास भाग पाडू नका. तुमच्या सवयी मुलांनी तशाच फॉलो केल्या पाहिजेत यासाठी मागे लागू नका. त्यांच्यासमोर विविध उदाहरणे ठेवा. ते इतके व्यवस्थित द्या की मुलाला तशी सवय लावावीशी वाटेल. मुले स्पंजसारखी असतात, त्यांना त्यांच्या पालकांचे निरीक्षण करून सवयी लागतात. जर तुम्हाला मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर, पालकांनो तुम्हाला त्या वेळी अभ्यासाचे पुस्तक उचलून वाचावे लागेल, असे त्या सांगतात. पालक जे करताना पाहतात तसेच अनुकरण मुले करतात, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

Sudha Murty Parenting Tips
मधुमेहाच्या रूग्णांसाठी काजू फायदेशीर!

साधं जगा- साधे राहणे हा जगण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सुधा मुर्ती नेहमीच त्यांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे ओळखल्या जातात. सुधा मूर्ती नेहमी पालकांना पालकत्वात त्याचप्रमाणे पालन करण्याचा सल्ला देतात. जेवण असो वा कपडे किंवा घराची सजावट असो, कोणत्याही गोष्टीत साधेपणा ठेवून चांगलं जगू शकता येतं. असे त्या सांगतात. अशी विचारसरणी त्यांनीही अंगिकारली आहे.

Sudha Murty Parenting Tips
संध्याकाळी केलेला व्यायाम Blood Sugar Level कमी करण्यासाठी फायद्याचा! अभ्यासात माहिती
kids
kidskids

मुलांना त्यांच्या आयडिया शेअर करायला सांगा- याबाबत सुधा मुर्ती यांनी एका मुलाखतीत किस्सा सांगितला आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी 50,000 रुपये खर्च करण्याऐवजी, त्यांनी मुलाला एक छोटीशी पार्टी करण्याचे सुचवले. त्या पार्टीनंतर उरलेली रक्कम मुर्ती कुटूंबाने ड्रायव्हरच्या मुलांना शिक्षणासाठी दिली. याबाबात मुर्ती म्हणाल्या की, सुरुवातीला माझा मुलगा यासाठी तयार नव्हता. पण आम्ही काहीच बोललो नाही. तीन दिवसांनंतर त्याने एका छोट्या पार्टीला होकार दिला. पण, मोठा झाल्यावर त्याने वाढदिवसाला माझ्याकडे शिष्यवृत्तीचे पैसे दिले. ते 2001 च्या भारतातील संसदेवरील हल्ल्यात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वापरण्यास सांगितले. मुलांना पैसे, दयाळूपणा, प्रेम वाटून घेण्यास शिकवले पाहिजे. असे केल्याने त्यांच्या आयुष्यात चांगला फरक पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.