Summer Care : कडक उन्हाळ्यात स्विमिंग पूलमध्ये जात असाल तर या चूका करू नका, नाहीतर...

पूलमध्ये उतरण्याआधी ही गोष्ट नक्की करा, फायद्याची ठरेल
Summer Care
Summer Careesakal
Updated on

Summer Care :

कडक उन्हाळा सुरू आहे त्यामुळे या काळात लोक स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पूलमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो. काही लोक या दिवसात वॉटर पार्कलाही भेट देतात. तिथे असलेले वॉटर स्लाईड्समध्ये मनसोक्त खेळतात. पण नंतर मात्र त्वचेचे आजार मागे लागतात.

कारण, आपण स्विमिंग करताना काही गोष्टींची काळजी घेत नाही. या कडक उन्हात आणि आंघोळ करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण, स्विमिंग पूलमध्ये अघोळ केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Summer Care
Nashik Summer Heat : 5 दिवसांत तापमान 6 अंशांनी घसरले! उकाडा कायम, किमान तापमानात 2 अंशांनी घट

लोकांनी स्वच्छ तलावातच आंघोळ करावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर तलावाचे पाणी थोडेसे घाण असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. या संसर्गाचा धोका विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त असतो.

दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलचे डॉ. अंकित कुमार म्हणतात की, प्रखर सूर्यप्रकाशात आंघोळ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे न केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यापूर्वी शरीराला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुरेसे पाणी नक्कीच प्यावे.

आंघोळ करताना तलावाचे पाणी गिळू नका. असे केल्याने पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. कारण तलावाच्या पाण्यात क्लोरीन असते. ते प्यायल्यास पोटात संसर्ग होऊ शकतो.

आंघोळ करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बाहेर सूर्यप्रकाश किंवा उष्ण हवामानामुळे थेट पूलमध्ये जाऊन आंघोळ करू नका. कारण याचा परिणाम शरीराच्या तापमानावर होऊ शकतो. पूलमध्ये आंघोळ करण्यापूर्वी थोडा वेळ पूल बाहेर फिरा किंवा निवांत बसा. यानंतर काही वेळ पूलमध्ये पाय ठेवून बसा. हे तुमच्या शरीराचे तापमान तलावाच्या पाण्याच्या पातळीवर आणेल. ज्यामुळे आंघोळ करताना किंवा नंतर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

Summer Care
Swimming Benefits : रोज स्विमिंग केल्यास तुमच्या शरीराला मिळतील 5 जबरदस्त फायदे, एकदा वाचाच

इनडोअर पूलमध्ये भिजण्याचा आनंद घ्या

डॉ. अंकित सांगतात की काही लोक अनेक तास तलावात आंघोळ करतात. या काळात शरीराचे तापमान कमी होते, पण तलाव मोकळ्या आकाशात असेल तर सूर्यप्रकाशही वरून येत राहतो. आंघोळीनंतर एखादी व्यक्ती जास्त वेळ उन्हात उभी राहिल्यास तापमान अचानक वाढू शकते. ज्यामुळे डिहायड्रेशन किंवा उष्माघात होऊ शकतो.

त्यामुळे इनडोअर स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ओपन एअर पूलमध्ये जात असाल तर जास्त वेळ आंघोळ करू नका आणि आंघोळ केल्यानंतर निवारा असलेल्या ठिकाणी जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.