Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

उन्हाळ्यात मेकओव्हर करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे हे जाणून घेऊया.
Summer Home Decor Tips
Summer Home Decor TipsSakal
Updated on

Summer Home Decor Tips: अनेक लोकांना सण किंवा ऋतूनुसार घराची सजावट करायला आवडते. खासकरून अनेक लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरात काही बदल करतात. यामुळे घराला नवा लुक मिळतो आणि आपल्याला फ्रेश वाटते. तुम्हालाही उन्हाळ्यात घराचे मेकओव्हर करायचे असेल तर पुढील पद्धतींचा वाप करू शकता.

नॅचरल लूक द्यावे

जर तुम्हाला नॅचरल लूक देणे आवडत असेल, तर कॉटनचे कुशन, सोफा कव्हर्स आणि टेबल कव्हर्स फुलांच्या आणि पानांचे प्रिंट असलेले वापरू शकता. याशिवाय घर अधिक आकर्षक बनवण्यासाठी भिंतींवर प्रिंटेड कॉटनचे पडदे लावू शकता.

हंगामी झाडे लावावे

घराला नैसर्गिक लूक देण्यासाठी घरामध्ये आणि आजूबाजूला हंगामी झाडे लावू शकता. इनडोअर प्लांट्स घराचा इंटीरियर लुक वाढवतात. यामुळे झाडे घरातील हवा शुद्ध राहते. तुम्ही बाल्कनीत आणि घरातील कोपऱ्यात इनडोअर झाडे लावू शकता.

सुगंधित मेणबत्त्या लाव्या

उन्हाळ्यात घराला फ्रेश ठेवण्यासाठी चांगल्या आणि सुगंधी अगरबत्ती लावू शकता. बाजारात अनेक प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती मिळतात.

Summer Home Decor Tips
Heart Care: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रागावर 'असे' ठेवा नियंत्रण

हलक्या रंगाचे पडदे

उन्हाळ्यात घर खूप गरम होतात. घर जास्त गरम होऊ नये यासाठी पडदे लावू शकता. या दोन्ही गोष्टी सूर्याच्या किरणांना खोलीत जाण्यापासून रोखतात, त्यामुळे गरम हवा वाऱ्याच्या मदतीने आत येत नाही. याशिवाय पडदे लावताना त्यांच्या फॅब्रिककडे विशेष लक्ष द्या. तसेच हलक्या रंगाचे पडदे वापरावे.

जाड कार्पेट वापर टाळा

हिवाळ्यात अनेक लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड कार्पेट वापरतात. हे कार्पेट केवळ थंडीपासून बचाव करत नाहीत तर घराचा लूकही वाढवतात. तुमच्याकडे अजूनही जाड कार्पेट असेल तर ते बदला. त्याऐवजी पातळ आणि हलके कार्पेट वापरा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.