Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात महिलांना फॅशनेबल राहायला आवडते. परंतु, त्यासोबतच, कम्फर्ट ही महत्वाचा आहे.
Summer Fashion Tips
Summer Fashion Tipsesakal
Updated on

Summer Fashion Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. काही राज्यांमध्ये तर उष्णतेचा अलर्ट ही देण्यात आला आहे. या उष्माघातापासून स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, आरोग्यासोबतच फॅशनकडे ही थोडे लक्ष द्यायला हवे.

उन्हाळ्यात महिलांना फॅशनेबल राहायला आवडते. परंतु, त्यासोबतच, कम्फर्ट ही महत्वाचा आहे. त्यामुळे, फॅशनेबल राहण्यासोबतच कम्फर्टेबल कपडे परिधान करण्यावर महिलांचा भर असतो. परंतु, हे कपडे निवडताना रंगांचा पॅटर्न देखील तितकाच महत्वाचा आहे. खास उन्हाळ्यामध्ये रंगांचे पॅटर्न्स व्यवस्थितपणे निवडले तर तुमचा लूक तितकाच कूल आणि स्टायलिश दिसतो.

आज आम्ही तुम्हाला खास उन्हाळ्यात कूल अन् स्टायलिश दिसण्यासाठी कोणते कलर पॅटर्न्स निवडायचे? त्याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कलर पॅटर्न्स आणि कलर कॉम्बिनेशनबद्दल.

Summer Fashion Tips
Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

ब्राईट कलर

आजकाल ब्राईट अर्थात गडद रंगांना महिलांकडून चांगली पसंती मिळत आहे. हे ब्राईट कलर्स उठून दिसतात आणि या रंगाच्या कपड्यांमुळे सुंदर लूक देखील मिळतो. विशेष बाब म्हणजे उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे परिधान केल्याने उष्णता कमी होते आणि आपला चेहरा फ्रेश दिसतो.

या फोटोत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने पिवळ्या रंगाचा मस्त आऊटफीट परिधान केला आहे. तिच्याप्रमाणे असा गडद पिवळ्या रंगाचा ड्रेस तुम्ही उन्हाळ्यात परिधान करू शकता. समरसाठी तिचा हा लूक बेस्ट आहे. सोनाक्षीसारखा पिवळ्या रंगाचा आऊटफीट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल.

डबल शेडच्या रंगांची निवड करा

उन्हाळ्यात लग्नाचा देखील हंगाम असतो. मे-जून पर्यंत लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे, उन्हाळ्यातील लग्नासाठी कोणत्या प्रकारचा लूक करावा? असा प्रश्न तरूणींना पडतो. समर वेडिंगसाठी महिलांची खास पसंती ही साडीला असते.

समर वेडिंगसाठी किंवा रिसेप्शनसाठी आजकाल सिक्विन्स साड्यांना मोठी पसंती असते. या साड्यांमध्ये तुम्ही डबलशेड असलेल्या रंगांची निवड करू शकता. डबलशेडच्या रंगांचा पॅटर्न सध्य ट्रेंडमध्ये आहे. अभिनेत्री संजना कपूरप्रमाणे तुम्ही डबलशेडची सिक्विन साडी समर वेडिंग किंवा रिसेप्शनसाठी नक्कीच निवडू शकता. अशा प्रकारची साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल.  

Summer Fashion Tips
Summer Fashion Tips : उन्हाळ्यात डेलीवेअरसाठी बेस्ट आहेत ‘या’ साड्या, अशा पद्धतीने करा स्टाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.