Summer Fashion Tips : उन्हाळ्यात शरीराला येणारा प्रचंड घाम आणि डिहायड्रेशनमुळे आपली चिडचिड होते. या वाढत्या उकाड्यावर मात करण्यासाठी आपण आहारात काही बदल करतो किंवा इतर काही गोष्टींची मदत घेतो. या सगळ्यात आपण फॅशनकडे जरा दुर्लक्षच करतो. त्यामुळे, आरोग्य, स्किनकेअर आणि केसांची काळजी घेण्यासोबतच आपण उन्हाळ्यातील फॅशनकडे ही पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यामध्ये आपण ज्या प्रकारचे कपड घालतो. त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होताना दिसतो. जसे की, जर आपण हेव्ही कपडे घातले तर यामुळे, शरीराला घाम येतो आणि खूप गरम होते. उन्हाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? त्यासंदर्भातील खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या फॅशनेबल टिप्स.
उन्हाळ्यात गडद रंगाचे आणि घट्ट कपडे घालणे टाळावे. शक्यतो सैलसर कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. मुलांनी खास करून कपड्यांचे लेअरिंग करताना टीशर्टवर जो कॅज्युअल शर्ट घातला असेल त्याचे बटन उघडे ठेवावे. यामुळे, तुमच्या लूकला चारचाँद ही लागतील आणि मोकळी हवा खेळती राहील.
मुलींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास या दिवसांमध्ये मुलींनी पलाझो, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट ड्रेस, पांढऱ्या किंवा लाईट रंगाच्या हलक्याफुलक्या प्रिंटच्या कुर्त्या परिधान कराव्यात. या प्रकारच्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. (comfort is important)
उन्हाळ्यात आपल्या शरीराला घाम भरपूर येतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये खास करून कॉटन आणि लिननच्या फॅब्रिकचे कपडे परिधान करावे. जेणेकरून घाम शोषला जाईल आणि तुम्हाला जास्त गरम होणार नाही. फॅब्रिकसोबतच तुम्ही कपड्यांवरील प्रिंटकडे ही खास लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात खास करून फ्लोरल प्रिंटचे कपडे घालावेत. यामुळे, तुमचा लूक कूल दिसण्यास मदत होते.
उन्हाळ्यात खास करून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यावर भर दिला जातो. यामागचे कारण देखील तितकेच खास आहे. कारण, पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तुम्हाला उष्णता जास्त जाणवत नाही.
यासोबतच लाईट किंवा फिकट रंगाच्या कपड्यांचा तुमच्या वॉर्डरोबमध्ये जरूर समावेश करावा. मुली खास करून पांढऱ्या रंगाच्या कुर्ती, लाईट रंगाचे ड्रेस, टॉप्स, चुडीदार, शॉर्ट ड्रेस, साडी, शर्ट किंवा पेन्सिल स्कर्ट ट्राय करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.