Summer Footwear: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय अन् कम्फर्टही हवा? वापरा 'असे' फुटवेअर

Summer Footwear: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे फुटवेअर वापरावे हे जाणून घेऊया.
Summer Footwear:
Summer Footwear:Sakal
Updated on

summer footwear tips make your look stylish comfortable

एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाच्या कडक झळा सुरू झाल्या आहे. उन्हाळ्यात आरोग्यासह फॅशनकडेही लक्ष देणे गरजेचे असते. ड्रेससोबतच योग्य फुटवेअर वापरणे गरजेचे असते.

तुम्ही कितीही छान ड्रेस आणि मेकअप केलात, पण फुटवेअर योग्य नसेल तर संपूर्ण लूकच खराब होतो. अनेक लोक पुर्ण लूककडे लक्ष देतात आणि फक्त फुटवेअरकडे दुर्लक्ष करतात. यामुळे संपूर्ण लूक खराब होतो. त्यामुळे कोणत्या ड्रेससोबत कोणत्या प्रकारचे फुटवेअर वापरावे हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात तुमच्या कलेक्शनमध्ये कोणते फुटवेअर असावे

  • क्लॉग्स

स्वीडिश आणि जपानी देशांतून आलेले क्लॉग्स आता भारतात फॅशन स्टेटमेंट बनले आहेत. उन्हाळ्यासाठी हे अतिशय आरामदायक फुटवेअर आहेत. क्लॉग्स घातल्याने घाम येत नाही आणि लूक देखील फॅन्सी दिसतो. तुम्ही जीन्स, लूज टी-शर्टसोबत हे फुटवेअर कॅरी करू शकता.

  • कोल्हापुरी चप्पल

कोल्हापुरी चप्पल चामड्यापासून बनवलेली असते. यामुळे पायाला कोणतीही ऍलर्जी होत नाही. तसेच, ते खूप मऊ आणि गुळगुळीत असते. यामुळे त्यांना परिधान केल्यावर खूप आरामदायक वाटते. याशिवाय शरीरातील उष्णता आणि घामही शोषून घेते. हे तुम्ही कुर्ती किंवा सूटसोबत कॅरी करू शकता.

  • एस्पाड्रिल्स

कॅनव्हास, कापूस आणि लिनेन सारख्या हलक्या वजनाच्या उत्पादनांपासून बनवलेले, एस्पाड्रिल्स हे अतिशय सुंदर आणि डिझाइनर फुटवेअर पर्याय आहेत. आरामदायक सामग्रीचे बनलेले असल्याने ते परिधान करण्यास खूपच आरामदायक आहेत.

Summer Footwear:
Summer Care : उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी
  • म्यूल्स

उन्हाळ्यातील सैल आणि आरामदायी कपड्यांसोबत म्यूल्स वापरू शकता. महिलांसोबतच या पुरुषही या फुटवेअरचा वापर करतात. म्यूल्स घालायला सोपे आणि चालायला आरामदायक असतात. तुम्ही ते कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेस घालू शकता.

  • लेदर चप्पल

लेदर चप्पल उन्हाळ्यात खूप आरामदायक असतात. जी तुम्ही जीन्स, शॉर्ट्स आणि स्कर्टसह घालू शकता. लेदर सँडल तुमच्या एथनिक लूक आकर्षक बनवतात. हे तुम्ही उन्हाळ्यातही घालू शकता.

  • पांढरे शुज

उन्हाळ्यात अनेक लोक पांढरे शुज वापरतात. तुम्ही हे शुज जीन्स, वनपिस शॉर्टस आणि स्कर्टसह कॅरी करू शकता. हे शुज पायाला आरामदायी असतात. तसेच पायाचे सुर्यकिरणांपासून बचाव होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()