उन्हाळ्यात सुद्धा राहाल कूल-कूल जर हेयर कंडीशनरमध्ये असतील 'हे' Ingredients

जर तुम्हाला उन्हाळा सुद्धा सुखद हवा असेल तर तुम्ही तुमच्या हेअर कंडिशनर मध्ये या नैसर्गिक घटकांचा समावेश आहे का ते जरूर पहा.
hair protection
hair protectionesakal
Updated on

कोल्हापूर : उन्हाचा परिणाम फक्त आपल्या त्वचेवर होत नाही तर त्याचा परिणाम केसावर ही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे केसांचे नुकसान होते. सूर्यकिरणात असलेले घातक किरणे आपल्या केसांना निर्जीव बनवतात. आपण या समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतो. परंतु हेअर कंडिशनर मध्ये काही घटक घालून आपण यावर उपाय काढू शकतो.

केस धुतल्यानंतर आपण सर्वजण हेअर कंडिशनरचा वापर करतो. जर कंडीशनर मध्ये पोष्टिक, (मॉइस्चराइजिंग आणि रिपेयरिंग इंग्रीडिएंट) केसावर योग्य उपाय करणारे घटक असणाऱ्या कंडिशनरची निवड आपण करावी. यामुळे आपल्याला अतिरिक्त लाभ मिळतात. एवढेच नव्हे तर असे कंडीशनर तुम्ही वापरा की ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा डोके शांत आणि थंड ठेवेल. यामुळे आपले केस सुद्धा चांगले राहतील.आपण या ठिकाणी हेअर कंडिशनर च्या बाबत माहिती घेणार आहोत जे तुम्हाला ज्यादा लाभ देतील आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्या केसांची काळजी ही ठेवतील.

जिनसेंग :

प्रदूषण घाम आणि सूर्याबरोबर संपर्क आल्यानंतर अनेक वेळा आपली केस डॅमेज होतात. परंतु एक घटक आहे जो हे सर्व रिपेअर करून आपल्याला फायदा पोहोचवतो. त्या घटकाचे नाव आहे जिनसेंग. अलिकडच्या हेअर कंडिशनर मध्ये या घटकाचा वापर केला जातो. हा घटक केसांना मजबूत करून केस तुटणे पासून वाचवतो. त्याच बरोबर केस अधिक चमकदार दिसण्यासाठी ही याचा उपयोग होतो.

मेन्थॉल :

हा एक असा घटक आहे ज्यामुळे केसांना चांगला फायदा होतो. त्यामुळे केसांच्या काळजी साठी हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. आपल्या केसांना व त्वचेवर मेन्थॉल थंडावा देतो. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना केसांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशावेळी आपण मेन्थॉल समाविष्ट असलेला हेअर केअर प्रॉडक्ट घेतले तर त्याचा चांगला फायदा होतो. मेंथॉल आपल्या केसांच्या मुळाजवळ असलेल्या त्वचेला स्वच्छ ठेवतो. तुम्ही मेंथोल युक्त हेअर कंडिशनर निवडत असाल तर तुमच्या केसांना नक्कीच थंडावा मिळेल त्याच बरोबर रसायन आणि ऊन्हाच्या प्रखर किरणाने डॅमेज होणारे केस यापासून तुम्ही वाचू शकाल. तुमचे केस अधिक सुंदर दिसण्यास मदत होईल.

ओट मिल्क :

ओमेगा सिक्स फेटी ऍसिड आणि व्हिटॅमिन सी यांनी समृद्ध असलेले ओट मिल्क उन्हाळ्यामध्ये आपल्या केसांच्या देखभालीसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. ओट मिल्क मध्ये असलेले अल्ट्रा-कैलमिंग आणि कंडीशनिंग गुण आपल्या केसांना अधिक सुपर सॉफ्ट बनवतात आणि केस मऊ राहतात.

मध:

मधापासून आपल्या सौंदर्यासाठी अनेक फायदे होतात.यामुळेच अनेक जण कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करताना त्यामध्ये मध हा घटक आहे का याची शहानिशा करतात. मध आपल्या केसांना ओलावा देण्याबरोबरच केस चमकदार ही बनवतो. यामध्ये असणाऱ्या अँटिअक्सिडेंट मुळे केस प्रदूषणामुळे डॅमेज होणारी केस वाचू शकते आणि ते अधिक हेल्दी ठेवते.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.