वाढत्या तापमानामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. वाढलेले तापमान लोकांना सहन न झाल्याने अनेक लोक हिट स्ट्रोकचे बळी पडले आहेत. आजवर आपल्याला इतकंच माहिती होतं की, तापमान वाढीचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. पण, असं नाही.
तापमानवाढीचा सध्य आपल्या मनावरही परिणाम होत आहे. उन्हाळ्यात ५० अंश सेल्सिअस इतके तापमान वाढल्यास काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. देशातील अनेक राज्यांतील रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये मानसिक रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानंतर लोक अस्वस्थता आणि झोप न लागण्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत की वाढत्या तापमानाचा तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते का?
अशाच वेगाने तापमान वाढत राहिल्यास देशातील मानसिक रुग्णांची संख्या आणखी वाढेल का? जर तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा जवळपास असेल तर तुम्ही तुमचे मानसिक संतुलन गमावू शकता का?
दिल्ली विद्यापीठाच्या भीम राव आंबेडकर कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाचे एचओडी नवीन कुमार म्हणतात, ' ‘शहरीकरणानंतर मानसिक रुग्णांची संख्या वाढली आहे. तापमानात वाढ झाल्याने या रूग्णांच्या संख्येवर परिणाम होतो. लोकांनी पर्यावरणाचे शोषण केले तर आपण या आजाराला बळी पडणार आहोत हे विसरून चालणार नाही.
अलिकडच्या वर्षांत तापमानाचा लोकांच्या मानसिक संतुलनावरही परिणाम झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे मुलांची मानसिक स्थिती बदलू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
जसे की अस्वस्थता, कामात रस नसणे, कोणाशीही बोलण्याची इच्छा नसणे, शांत आणि एकटे राहणे, मनात अस्वस्थता होय. ज्यावर वेळेवर उपचार न केल्यास Stress Attack येऊ शकतात.
मॅक्स हॉस्पिटल, पटपरगंजच्या मानसोपचार विभागाचे डॉ. राजेश कुमार म्हणतात, उष्णता वाढल्याने मानसिक कोण-कोणत्या गोष्टी बिघडतात. आपल्या मनावर त्याचा कसा परिणाम होतो याबद्दल माहिती घेऊयात. 'उष्णतेच्या वाढीमुळे बायपोलर इफेक्टिव्ह डिसऑर्डर मोठ्या प्रमाणावर नियंत्रित होतो किंवा तो प्रमाणाबाहेर ऍक्टीव्ह होतो.
मानवी मनाच्या विकाराचे दोन भाग करता येतात, एक म्हणजे व्यक्ती डिप्रेशनचा शिकार होतो. तर दुसरे म्हणजे व्यक्ती हायपर होतो ज्याला मेनिया विकारही म्हणतात.
नैराश्यात व्यक्ती काय करतो?
नैराश्यात गप्प राहणे, कमी बोलणे, नकारात्मक विचार करणे, एकटे राहणे, आपण निरुपयोगी आहोत, काहीही करू शकत नाही आपला काही उपयोग नाही, मरणे चांगले आहे असे विचार येतात. तसेच, हसणे आणि रडणे या दोन गोष्टी अती होतात किंवा होतच नाहीत.
तर, मेनियामध्ये व्यक्ती खूप वेगाने बोलतो. व्यक्तीचा मूड हाय राहतो. तर, तो स्वत:ला श्रेष्ठ समजत राहतो. स्वत:कडे असलेला पैसा, शिक्षण याचा त्याला गर्व चढतो. स्वत:च म्हणणं पटवून देण्यासाठी तो सर्वांशी वादही घालतो. एक प्रकारे मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीसारखेच हा आजार आहे.
अशा लोकांना कमी झोप येते आणि जास्त औषधे घेतात. एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात अशा रुग्णांना जास्त त्रास होतो. उष्णतेमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.