Summer Skin care routine: उन्हाळ्यात अशी घ्या चेहऱ्याची काळजी, टॅनिंग जाऊन उजळेल चेहरा

रोजच्या दिनचर्येत Daily Routine तुम्ही काही सवयींचा आणि गोष्टींचा समावेश केला तर उन्हाळ्यातही तुमची त्वचा निरोगी, स्वच्छ आणि चमकदार राहू शकते.
Skin Care Routine
Skin Care RoutineEsakal
Updated on

उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून त्वचेचं संरक्षण कसं करावं ही एक मोठी चिंता असते.  उन्हात बाहेर पडायचं म्हणजे चेहरा झाकणं, गॉगल्स Goggles घालायचे आणि सुर्यापासून रक्षण करायचं असे सर्व प्रयत्न सुरु होतात. मात्र तरीही यामुळे त्वचा Skin पुर्णपणे सुरक्षित नसते. उन्हाळ्यात त्वचेच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. दरवेळी उन्हापासून त्वचेच संरक्षण करणं शक्य होतचं असं नाही.  Summer Skin Care Tan Removal Tips

यासाठीच उन्हाळ्यामध्ये Summer तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये Skin Care Routine बदल करणं गरजेचं आहे. रोजच्या दिनचर्येत Daily Routine तुम्ही काही सवयींचा आणि गोष्टींचा समावेश केला तर उन्हाळ्यातही तुमची त्वचा निरोगी, स्वच्छ आणि चमकदार राहू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याची टॅनिंग Tanning दूर करून चेहरा उजळण्यास मदत होईल. 

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढणं गरजेचं- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा अधिक तेलकट होवू लागतो. नॉर्मल त्वचा असलेल्यांची त्वचा देखील या दिवसांमध्ये तेलकट होवू लागते अशा वेळी ऑईली स्किन असलेल्यांसाठी तर मोठी अडचण निर्माण होते. यासाठीच उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी योग्य फेसवॉश निवडणं गरजेचं  आहे. असं फेसवॉश निवडा ज्याने त्वचा खोलवर स्वच्छ होवून अतिरिक्त तेल निघेल.

इतर दिवसांमध्ये जर तुम्ही २-३ वेळा चेहरा धुवत असाल तर उन्हाळ्यात तुम्हाला हे प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघण्यास मदत होईल. चेहरा स्वच्छ होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. 

त्वचा हायड्रेट ठेवणं गरजेचं- त्वचेला स्वच्छ ठेवण्यासोबतच ती हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा एखाद्या हायड्रेटींग फेसवॉशचा उपयोग करू शकता. तसचं काही फळांचा फेस पॅक लावूनही त्वचा हायड्रेट राहू शकते. 

यासोबतच भरपूर पाणी पिणं आणि फळं खाणं हा देखील त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठीचा चांगला पर्याय आहे. 

हे देखिल वाचा-

Skin Care Routine
Healthy Skin Care Tips : तरूण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या का येतात?, ही आहेत कारणं

डेड स्किन काढणं गरजेचं- त्वचा तेलकट होत असल्याने या काळात त्वचेवर घाण, घाम, तेल आणि धुळीचा धर तयार होतो. तसचं अतिरिक्त तेलामुळेही सीरम तयार होतं. यासाठी वेळोवेळी चेहरा स्क्रब करणं गरजेचं आहे. डेड सेल्स काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती एक्सफोलिएटचा वापर करू शकता. यामुळे टॅनिंगही दूर होईल.

याशिवाय बाजारत मिळणाऱ्या काही चांगल्या एक्सफोलिएटचा गदेखील तुम्ही वापर करू शकता. यामुळे त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. 

फळांचं सेवन करा- तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिझनल फळं आणि भाज्यांच्या समावेश करणं गरजेचं आहे. त्वचेला बाहेरुन पोषण देण्यासोबतच आतून पोषण मिळणं देखील तितकचं गरजेचं आहे. यासाठी फळं आणि भाज्या हा चांगला पर्याय आहे.

फळांच्या आणि ज्यूसच्या सेवनाने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. तसचं फळांमधील व्हिटॅमिन सी आणि इतर खनिजांमुळे देखील त्वचा तजेलदार आणि चमकण्यास मदत होईल. 

सनस्क्रिनचा वापर- त्याचसोबत सनस्क्रिन हा उन्हाळ्यासाठी अतिआवश्यक आहे. यामुळे सुर्याच्या UV किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. तुमच्या त्वचेप्रमाणे सनस्क्रीन निवडणं गरजेचं आहे. चेहरा तेलकट असल्यास क्रिम बेस सनस्क्रीन  न निवडता ते  वॉटरबेस्ट किंवा जेलबेस्ट सनस्क्रीन निवडावं. नाहीतर चेहरा चिकट होवून पिंपल येऊ शकतात.  Sunscreen for summers 

तसचं सनस्क्रीन हे किमान ३० SPF क्षमता असलेलं तरी असावं. घरातून बाहेर निघण्यापूर्वी किमान २० मिनिट आधी ते लावावं. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात बाहेर राहणार असाल. तर अशावेळी सतत घाम येऊ शकतो. त्यामुळे शक्य झाल्यास काही तासांनी पुन्हा चेहरा धुवून सवस्क्रीन लावल्यास जास्त फायदा होईल. 

टोनिंग गरजेची- स्किनचा Ph लेवल बॅलेन्स करणं गरजेचं असतं. पीएच लेवलचा बॅलेन्स राखण्यासाठी टोनरचा उपयोग करणं गरजेचं आहे. नैसर्गितरिच्या त्वचा टोनिंग करण्यासाठी तुम्ही गुलाबजल, कोरफडचा वापर करु शकता.

उन्हाळ्यात या गोष्टींचा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास त्वचा निरोगी ठेवून तजेलदार ठेवणं शक्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.