Portable AC: देशात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात आता घराघरांमध्ये पंखे, कुलर आणि AC दिवसरात्र सुरू झाले आहेत. अनेकजणांकडे एसीची सोय असते.
मात्र बऱ्याचदा काही ठराविक खोल्यांमध्येच हा एसी बसवण्यात आला असतो. एखादा बेडरुमBedroom किंवा लिव्हिंग रुम मध्ये एसी असतो. Summer Tips in Marathi Mini Portable AC will keep your room cool
तर काहीजण उन्हाळा Summer आला की नवा एसी Air Conditioner बसवण्याचा प्लान देखील आखतात. मात्र यावेळी देखील AC कुठे आणि कोणत्या खोलीत बसवावा असा सर्व सामान्यांना प्रश्न पडतो. अनेकांना संपूर्ण घरामध्ये एअर कंडीशनर बसवणं शक्य नसतं. त्यामुळे घरातील काही लोकांना मात्र या AC चा आनंद घेता येत नाही.
तुम्हालाही तुमच्या घरात एखादा एक्स्ट्रा AC हवा आहे. मात्र यासाठी तुमचं बजेट नाही तर आम्ही तुम्हाला एका पोर्टेबल एअर कंडीशनरचा स्वस्त आणि मस्त पर्याय सांगणार आहोत. हा AC स्वस्त तर आहेत शिवाय याच कुलिंग देखील जबरदस्त आहे. याशिवाय या पोर्टेबल AC चे अनेक फायदे आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उन्हाळ्यासाठी जर प्रत्येक खोलीत वेगळा AC बसवणं तुम्हाला शक्य नसेल तर हा पोर्टेबल ACचा पर्याय तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. या ACचं नावं आहे Whitecherry mini air conditioner बाजारात हा पोर्टेबल AC सहज उपलब्ध होईल. मात्र ऑनलाईन मार्केटमध्ये हा तुम्हाला अधिक स्वस्त मिळेल. शिवाय अनेकदा यावर वेगवेगळ्या ऑफर्सही उपलब्ध असतात.
बाजारामध्ये हा एसी साधारण २ ते अडीच हजारांच्या आसपास उपलब्ध आहे. तर ऑनलाईन दीड हजारात तुम्हाला पोर्टेबल मिनी AC उपलब्ध होईल. हा AC तुम्हाला एका जागी फिट करण्याची गरज नाही. हा AC खुपच हलका आणि हाताळायला सोपा असल्याने तुम्हा हवा तिथे नेणं शक्य आहे.
हे देखिल वाचा-
विजेची आवश्यकता नाही
हा AC जोडण्यासाठी तुम्हाला विजेची देखील गरज भासणार नाही. या AC सोबत एक USB Connector मिळतो. ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटप किंवा कंम्प्युटर एसी जोडू शकता. त्यामुळेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठीच तसंच विद्यार्थ्यांसाठी हा एक फायदेशीर पर्याय आहे. या AC मध्ये पाण्यासाठी देखील एक टँक दिला आहे.
जबरदस्त कुलिंग
हा मिनी पोर्टेबल एअर कंडिशनरदेखील जबरदस्त कुलिंग देत. जर रुम गर्म असेल तर AC
सुरु केल्यानंतर काही मिनिटांमध्येच रुम गार होण्यास सुरुवात होते.
Whitecherry mini air conditioner सोबतच सध्या ऑनलाईन मार्केटमध्ये एक से बढकर एक मिनी पोर्टेबल AC उपलब्ध आहे. हे AC उन्हाळ्यात तुम्हाला गरमी पासून सुटका होण्यासाठी मदत करतील शिवाय खिशाला परवडाणे आणि घरात कुठेही फिट होतील असे हे AC तुमच्या नक्कीत पसंतीस पडतील. अशाच काही अन्य एअर कंडिशनरचे पर्याय कोणते आहेत पाहुयात...
PAXTON Sales Mini Portable AC- या पोर्टेबल AC ची किंमत १२९९ रुपये एवढी आहे. यात बिल्ट-इन मूड लाइट देण्यात आली आहे जी ७ वेगवेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळते. हा थ्री इन वन AC आहे असं म्हणायला हरकत नाही . कारण हा कुलिंग करणं, ह्युमिडिफाई आणि प्युरीफाई करणं अशी तीन कामं करतो. यात पाणी भरून बस प्लग इन करून बटन ऑन करा आणि थंड हवेची मज लुटा.
URGIN Portable Mini Cooler- या USB वर चालणारा ड्युल ब्लेड एअर कंडिशनर आहे. या AC चा वापर घरातील कोणत्याही खोलीसाठी , किचन तसचं दुकानात आणि गाडीमध्ये करता येऊ शकतो. या ACमध्ये बर्फ टाकण्यासाठी एक ट्रे देण्यात आला आहे. या मिनी एअर कंडिशनरचा ब्लोअर एअरफ्लोची दिशा कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. ऍमेझानवर याची किंमत केवळ ४९९ रुपये इतकी आहे.
Moblios Portable AC- हा देखील एक पोर्टेबल AC असून कुठेही ठेवणं शक्य आहे. हा AC 3 इन 1 काम करतो. यात एअर कंडिशन तसचं ह्युमिडिफायर आणि प्युरीफायर अशा तिन प्रोग्राममध्ये काम करण्याची क्षमता आहे. ऑनलाईन याची किंमत १,७४९ इतकी आहे.
ZOFEY Portable Mini Ac- या एअर कंडिशनरमध्ये ५०० मिलीलीटर पाण्याच्या टाकीसोबत उपलब्ध आहे. यात तुम्हाला ३ स्पीड एडजस्टेबल विंड स्पीड पर्याय मिळतात. तसचं याची पाणी भरण्याची टाकी ८ तास चालू शकते. ऍमेझॉनवर या पोर्टेबल ACची किंमच १२९९ रुपये इतकी आहे.
तर यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला मोठा खर्च न करता घर थंड ठेवायचं असेल तर तुम्ही अशा मिनि पोर्टेबल ACचा पर्याय नक्कीत निवडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.