Summer Travel : मे महिन्यात कूल राहायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन, ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Summer Travel : उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी अनेक जण फिरायला जातात.
Summer Travel
Summer Travelesakal
Updated on

Summer Travel : मे महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. एप्रिल महिना संपला की उन्हाचा तडाखा हळूहळू वाढत जातो. मे महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे, या उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी अनेक जण फिरायला जातात.

यंदाच्या मे महिन्यात तुम्ही देखील बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतातील काही राज्यांमध्ये नक्कीच फिरायला जाऊ शकता. आज आम्ही खास तुम्हाला त्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत? कोणती आहेत ती ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Summer Travel
Maharashtra Travel : थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले..! महाराष्ट्रातल्या ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी, कुटुंबासोबत नक्की भेट द्या

चेरापुंजी

मेघालय या राज्यामध्ये सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे चेरापुंजी होय. चेरापुंजी हे एक उत्तम हिलस्टेशन आहे. या ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी हे ठिकाण फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. या ठिकाणचा निसर्ग पाहून तुम्ही प्रेमात पडाल यात काही शंका नाही. शिवाय, चेरापुंजीमध्ये उंच पर्वत, अनेक गुहा, धबधबे आणि काही प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत. या ठिकाणांना ही तुम्ही भेट देऊ शकता. मे महिन्यात या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला मस्त थंडावा मिळू शकेल. (cherapunji)

तवांग

अरूणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे ठिकाण स्थित आहे. जर तुम्हाला निवांत आणि शांत वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही तवांगला नक्कीच भेट देऊ शकता. समुद्रसपाटीपासून १० हजार मीटरवर वसलेले हे शहर निसर्गसौंदर्याने अन् पर्वतांनी परिपूर्ण असे आहे. येथील दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश, झरे, नद्या, तवांग मठ आणि नूरनांग धबधब्याला ही तुम्ही भेट देऊ शकता. मे महिन्यात तुम्हाला या ठिकाणी आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळेल. (tawang)

दार्जिलिंग

पश्चिम बंगाल या राज्यातील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. चहाच्या मळ्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्ही येथील चहाचे मळे, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश, प्रेक्षणीय स्थळे येथील रेल्वे हे सगळ काही पाहू शकता. गर्दीपासून दूर कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर दार्जिलिंग हे ठिकाण बेस्ट आहे. (Darjeeling)

Summer Travel
Summer Vacation Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत बजेट-फ्रेंडली ट्रीप प्लॅन करायचीय? मग, 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.