शोध स्वतःचा - सरेंडर

सध्या सगळीकडे पसरलेल्या अवघड आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मनाला अनेक नकारात्मक आणि हताश करणारे विचार भंडावून सोडत आहेत.
शोध स्वतःचा - सरेंडर
Updated on
Summary

सध्या सगळीकडे पसरलेल्या अवघड आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मनाला अनेक नकारात्मक आणि हताश करणारे विचार भंडावून सोडत आहेत.

सध्या सगळीकडे पसरलेल्या अवघड आणि अनिश्चिततेच्या वातावरणात मनाला अनेक नकारात्मक आणि हताश करणारे विचार भंडावून सोडत आहेत. कामाची असुरक्षितता, सीमित हालचाल यांमुळं चिडचिड घरातल्यांवर निघते आणि स्वतःवरही. मनावर एक प्रकारचं सावट आलं आहे. अनेकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नाहीत, काहींची नोकरी धोक्यात तर व्यावसायिकांच्या नियोजनावर पाणी फिरत आहे, जागेचे भाडे, बँकेचा हप्ता भरण्यासाठी होणारी पैशाची चणचण, घरातील स्त्रियांवर कामाचा अतीभार आणि असं बरंच काही. अशा वातावरणात मार्ग काढण्याची धडपड आपापल्या पातळीवर आपण करतच असतो पण मानसिक आरोग्याकडं पाहण्याचीही खूप गरज आहे.

भौतिकदृष्ट्या सर्वाइव्ह होऊ सुद्धा, पण मनाच्या उभारणीसाठी आणि चित्त थाऱ्यावर ठेवण्यासाठी कसलातरी आधार लागतो. आपल्यापैकी प्रत्येकाला आपलं दुःख मोठं, असंच वाटतं. माझी आई नेहमी म्हणते, ‘कठीण काळात आपल्यापेक्षा ज्यांना त्रास जास्त आहे त्यांच्याकडं पाहावं, आपल्या दुःखाचं ओझं कमी वाटू लागतं आणि आपलं इतकंपण वाईट नाही चाललंय असा दिलासा मिळून चिंता कमी होते.’ उदाहरणार्थ, कोरोना झालाय पण फिजिशिअनने होम क्वारंटाइनला परवानगी दिली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही करावं लागलं. अशावेळी आयसीयूमधील कोरोनाबाधित रुग्णांचे काय हाल होत असतील, याचा विचार करावा.

शोध स्वतःचा - सरेंडर
थॉट ऑफ द वीक : एक क्षण - स्व-जागरूकतेचा 

मेंदू आणि स्वीकार्हता

‘When we can’t change the situation we are challenged to change ourselves’ अशी इंग्रजीत म्हण आहे. आपला मेंदू बदल (change) सहजासहजी स्वीकारत नाही. शक्य तितका त्याचा प्रतिकार करतो. मनाची लवचिकता हळूहळू विकसित केली, की परिस्थिती स्वीकारण्यात मदत होते. नाहीतर त्याचा विरोध करण्यातच आपली शक्ती खर्ची पडत राहते. हा शक्तीचा अपव्यय वाचवता आल्यास पुढच्या आराखड्यासाठी वापरता येतो. आसने, प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास सातत्याने करत राहणे; पण योग हा तेवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता स्वाध्याय म्हणजे योग ग्रंथांद्वारे तत्त्वज्ञानाचा ही अभ्यास करावा. यातून जे आकलन शब्दांद्वारे होईल ते पुन्हा पुन्हा आयुष्यात कसं उतरेल या मार्गाकडं हळूहळू वळावं.

लहानपणी आपले बाबा खेळ म्हणून आपल्याला हलकेच वर फेकून झेलायचे, तेव्हा आपण त्यांच्यावर १०० टक्के विश्वास ठेवायचो. आपण पडणार नाही आणि सेफ हँड्समध्ये आहोत याची पूर्ण खात्री असायची आणि खात्री होती म्हणूनच तो खेळ आनंदानं खेळलो. आपण मोठे झालो आणि आपल्या विश्वासाचं ओझं स्वतःच वाहायला लागलो. आपल्या स्वतःला सोडवून गुरूंवर, वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवल्यास बाबांसारखेच वेळ पडली तर तेही कॅच करतील असा भाव ठेवावा. तुमचे प्रयत्न यथाशक्ती करून झाले, की उरलेला भार अक्षरशः सोडून द्यावा - अशा शक्तीवर जी सतत आपल्या आजूबाजूला आणि आत प्रज्वलित आहे. काहीवेळा उच्च विद्याविभूषित असून किंवा कर्तृत्व असून हे सर्व उपयोगी पडत नाही, योग्य मार्ग सापडत नाही, तेव्हा अज्ञात शक्तीपुढं पूर्ण सरेंडर व्हावेच लागते. ही पराभूतता नाही, तर प्रचंड धैर्याची गोष्ट आहे.

आदि शंकराचार्यलिखित गुर्वाष्टकामध्ये म्हटले आहे -

“मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् |”

जगातील सर्व गोष्टी तुमच्याजवळ असूनही गुरूंच्यासमोर मन नमलं नाही, तर काय उपयोग काय उपयोग काय उपयोग! अर्थात गुरूंच्या रूपात ही अज्ञात शक्तीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.