Surya Grahan 2023: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण... कधी होणार, कुठे दिसणार अन् काय घ्यावी खबरदारी?

हे सूर्यग्रहण कोणत्या वेळेत आणि नेमके कुठे दिसणार आहे ते जाणून घेऊया.
Surya Grahan
Surya Grahansakal
Updated on

वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आज रात्री दिसणार आहे. हे सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्या आणि शनी अमावस्या यांच्या संयोगाने होत आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे.

हे सूर्यग्रहण आज किती वाजता होणार हे जाणून घेऊया. भारतात ते दिसेल की नाही आणि त्यात सुतक काळातील नियम लागू होतील की नाही.

सूर्यग्रहण वेळ

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि रविवार, 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल. म्हणजेच ग्रहणाचा कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. ग्रहण संपताच दुसऱ्या दिवशी सकाळी शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल.

सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. हे सूर्यग्रहण भारतातही दिसले नाही.

Surya Grahan
Surya Grahan : कंकणाकृती सूर्यग्रहण नेमके कुठे दिसणार? इथे वाचा सविस्तर

सूर्यग्रहण कुठे दिसणार? (सूर्यग्रहण 2023 कधी आणि कुठे पहावे)

हे कंकणाकृतीचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, उत्तर आफ्रिकेचा पश्चिम किनारा, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध असेल की नाही?

सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. सुतक काळ तेव्हाच वैध असतो जेव्हा भारतात सूर्यग्रहण दिसते. भारतात वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही लागू होणार नाही.

काय घ्यावी खबरदारी?

सूर्यग्रहण काळात आहार घेणे टाळावे. गरोदर महिलांनी किंवा वृद्धांनी घराबाहेर पडणे टाळावे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी असे कोणतेही बंधन असणार नाही. यावेळी देवाची पूजा करावी. ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर आंघोळ करा किंवा हात पाय धुवा.

सूर्यग्रहणाचा प्रभाव अशुभ असल्यास काय करावे?

ग्रहणकाळात तुमच्या गुरु मंत्राचा आणि सूर्यमंत्राचा जप करा. ग्रहणानंतर स्नान जरूर करा. सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करा. गूळ, गहू, पीठ किंवा तांब्याचे भांडे दान करणे शुभ राहील.

ग्रहण काळ आणि मंत्र जप

'श्री कृष्ण शरणं मम' या मंत्राने योगेश्वर कृष्णाची पूजा करावी. गायत्री मंत्राचा जप करून सूर्याची उपासना करा. महामृतंजय मंत्राने भगवान भोलेनाथाची पूजा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.