Swami Samarth Prakatdin: स्वामी समर्थांचा व्हायरल होणारा ‘तो’ फोटो खरा आहे का?

स्वामींच्या परवानगी शिवाय फोटो काढल्याने तो फोटोग्राफर बुचकळ्यात पडला होता?
Swami Samarth original photo
Swami Samarth original photoesakal
Updated on

Swami Samarth :  

आजकाल दर गुरूवारी एखाद्या तरी ग्रूपवर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे विचार, त्यांचे फोटो शेअर केले जातात. स्वामी भक्तांची व्याप्ती वाढली असल्याचे यातून दिसते. प्रत्येक गावागावात त्यांचे केंद्र निर्माण झाले आहे. स्वामी समर्थांनी केलेले उपदेश, जीवन जगताना किती कामी येतात त्याचे कोट्स सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

तुम्ही अनेक वेळा स्वामी समर्थांचा खरा फोटो पाहिला असेल. स्वामी समर्थांचा हा फोटो एका कंपनीच्या फोटोग्राफरने घेतला आहे. असा उल्लेख त्यात असतो. खरंच स्वामींच्या काळात कॅमेरा होता का, खरंच त्यावेळी काही चमत्कार झाला होता का? याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Swami Samarth original photo
स्वामी समर्थ उद्योग समूहाची वार्षिक सभा खेळीमेळीत

१८५० चा काळ

स्वामींचा फोटो घेणाऱ्या कोडॅक कंपनीचा कॅमेरा जॉर्ज इस्मन कोडॅक यांनी सन १८५० ते ५६ मध्ये तयार केला. खर्‍या अर्थाने ते कॅमेर्‍याचे जनक. त्यावेळी त्यांची कोडॅक कंपनीच स्वत: छायाचित्रे काढायची. त्यावेळी छायाचित्रकाराला स्वत: प्लेट तयार करून त्यावर सिल्व्हर नायट्रेट हे रसायन लावून छायाचित्र काढावे लागायचे.

असं सांगितलं जातं की, कोडॅक कंपनीने भारतातील राजे महाराजे, गुरू यांचे फोटो घेण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवला होता. त्या काळात भारताचे शाही वैभव हे जगातील इतर देशांपेक्षा नक्कीच वेगळे होते. त्यामुळे जगालाही आपल्या देशाची भुरळ पडली होती.

Swami Samarth original photo
स्वामी समर्थ सेवा केंद्रात विकास कामांना प्रारंभ

अशा वातावरणात कोडॅक कंपनीचा प्रतिनिधी मुंबईत आला. त्यावेळी वार्तापत्रांमध्ये देखील स्वामींचा महिमा छापून येत होता. चार जानेवारी 1970 च्या ‘थिआॅसॉफिस्ट’च्या अंकात स्वामींच्या दर्शनाला वर्षाला चार लाख लोक अक्कलकोटला जातात, असे वर्णन छापून आले होते.

नेमकं हेच कोडॅक कंपनीच्या संबंधित प्रतिनिधीच्या पाहण्यात आले. त्याने अक्कलकोटला जाण्याचे ठरवले. मनात स्वामींचा फोटो घ्यावी अशी इच्छा घेऊन तो व्यक्ती स्वामींपर्यंत पोहोचला देखील. स्वामींबद्दल माहिती घेऊन फोटोग्राफर स्वामींच्या दरबारात पोहोचला. अन् तो मागे लपूनच स्वामींचे फोटो काढू लागला. त्याने स्वामींचे ३३ फोटो काढले. पण स्वामींची परवानगी न घेता. नेमकं हेच त्याचं चुकलं.

Swami Samarth original photo
गुरूदेव सेवा मंडळातर्फे सर्व संत स्मृती दिन साजरा

आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामींचा एकही फोटो आला नाही. फोटोग्राफरही बुचकळ्यात पडला. त्याला कळालेच नाही की नक्की काय चुकलं. इतके फोटो घेऊनही जेव्हा फोटो आले नाहीत. तेव्हा त्याने स्वामींचे दर्शन घेतले अन् सांगितले की मी तुमच्या इच्छेविरूद्ध फोटो घेतले ते आले नाहीत.

कृपया मला तुमचा एक फोटो काढण्याची परवानगी द्यावी. आणि स्वामींनी जेव्हा होकार दिला तेव्हाच त्या फोटोग्राफरने फोटो काढला. स्वामींचे भक्त चोळप्पा महाराजांसोबतही स्वामींचा फोटो यावेळी काढलेला आहे. हे फोटो आपल्याला स्वामींच्या अक्कलकोटच्या मंदिरात पहायला मिळतात.

Swami Samarth original photo
Datta Jayanti 2023 : श्री गुरूदेव दत्तांचा जन्मकाळ सायंकाळी सहा वाजता का केला जातो?
Joshi

अक्कलकोटच्या मंदिरातील तो फोटो

अक्कलकोटच्या स्वामींच्या मंदिरात मूळ गाभाऱ्याशेजारी असलेल्या शयनकक्षात स्वामींची गादी आणि एक फोटो पहायला मिळतो. तोच हा फोटो आहे जो कोडॅक कंपनीने काढला आहे. तसेच, स्थानिक लोक सांगतात की, स्वामींचा हा फोटो जिवंत असल्यासारखा भासतो. म्हणजेच एखादा थ्री डी फोटो असल्यासारखा हा फोटो तुम्ही जिथून पहाल तिथून तुमच्याकडे साक्षात स्वामीच पाहत आहेत असे भासते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.