Swimming Benefits : वयाच्या सत्तरीतही बारा महिने स्विमिंग; वेगळ्या व्यायामाची नाही गरज, मिळते ऊर्जा

अशी काही ज्येष्ठ मंडळी आहे की जे बाराही महिने स्विमिंग करतात. यातील बहुतांश मंडळींचे वय हे सत्तरच्या आसपास आहे.
Swimming Benefits :
Swimming Benefits : Sakal
Updated on

Swimming Benefits : उन्हाळ्यात जलतरण तलावावर गर्दी करणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, पावसाळा सुरू झाला की हौशी नागरिक स्विमिंगला येणे बंद करतात. अशी काही ज्येष्ठ मंडळी आहे की जे बाराही महिने स्विमिंग करतात. यातील बहुतांश मंडळींचे वय हे सत्तरच्या आसपास आहे. स्विमिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते व एक वेगळी ऊर्जा मिळते, असे मत या ज्येष्ठांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले.

सध्या पावसाळा सुरू आहे. शहरात सकाळी आणि संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. या दिवसांतही महापालिका सिद्धार्थ जलतरण तलावावर स्विमिंगसाठी येणाऱ्यांची संख्या चारशेहून अधिक आहे. यात बहुतांश मंडळी ही सत्तरहून अधिक वयाची आहे.

पोहल्याने होणारे फायदे

कॅलरीज बर्न करण्यासाठी उपयोगी

रोज पोहण्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते. पोहण्याने चालण्यापेक्षा कॅलरी जलद बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

नैराश्य कमी करण्यासाठीही फायद्याचे

रोज पोहल्याने मनाला शांती मिळते. यामुळे नैराश्य कमी होण्यासोबतच चिंतेची समस्याही दूर होते. पोहण्यामुळे चांगली झोप लागते. त्यामुळे नैराश्यही कमी होते. मूडही फ्रेश राहतो आणि नैराश्याची लक्षणे कमी करते.

रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त

पोहल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह लवकर होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच हृदयही दीर्घकाळ निरोगी राहते.

Swimming Benefits :
Yoga Tips: पाठीचे स्नायू लवचिक करण्यासाठी 'या' तीन आसनांचा करा सराव

शरीर लवचिक बनते

रोज पोहल्याने शरीर लवचिक तसेच चपळ बनते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासह शरीर लवचिक बनवण्यास मदत करतो.

हाडे मजबूत होतात

रोज पोहल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांचे दुखणेही सहज निघून जाते. असे नियमित केल्याने हाडांना बळ मिळते आणि ते दीर्घकाळ निरोगी राहतात.

माझे वय सत्तर असून, बाराही महिने स्विमिंग करतो. या स्विमिंगमुळे सगळ्या शरीराची हालचाल होते. व्यायाम होतो. यामुळे स्विमिंग ही शरीरासाठी चांगलीच आहे. तर, पावसाळ्यात पावसाळ्याचे थेंब अंगावर जेव्हा पडतात त्यावेळेस एक वेगळाच आनंद मिळतो.

— एकनाथ शेळके

मी १९९४ पासून सिद्धार्थ जलतरण तलावात स्विमिंग करीत आहे. स्विमिंगमुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो. आरोग्य तंदुरुस्त राहते. तसेच, ब्लड सर्क्युलेशन होण्यास मदत होते. जवळपास ३० वर्षांपासून मी तीनही ऋतूंमध्ये स्विमिंग करायला येतो.

—एस.पी. जवळकर

माझे वय ६६ आहे. मी रोज पोहण्यासाठी सिद्धार्थ जलतरण तलावात येतो. स्विमिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पोहण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. एखादा तरी दिवस स्विमिंगला गेलो नाही तर अंग दुखायला लागते.

— रुस्तुम तुपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.