World Malaria Day 2024 : मलेरिया आणि डेंगूमध्ये नेमका फरक काय ? जाणून घ्या दोन्हींची लक्षणे

World Malaria Day 2024 : जगभरात दरवर्षी २५ एप्रिलला 'जागतिक मलेरिया दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
World Malaria Day 2024
World Malaria Day 2024esakal
Updated on

World Malaria Day 2024 : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांची लागण होते. या आजारांमध्ये प्रामुख्याने डेंगू आणि मलेरिया या आजारांचा समावेश असतो.

डेंगू आणि मलेरिया हे दोन्ही आजार धोकादायक आहेत. जर या दोन्ही आजारांची लागण व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

जगभरात दरवर्षी २५ एप्रिलला 'जागतिक मलेरिया दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. आज जागतिक मलेरिया दिनानिमित्त आपण मलेरिया आणि डेंगू या दोन्ही आजारांच्या लक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.

कारण, या दोन्ही आजारांबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आढळून येते. त्यामुळे, आज आपण डेंगू आणि मलेरियाची लक्षणे कोणती ? आणि या दोन्ही आजारांमध्ये फरक काय ? याबद्दल जाणून घेणार आहोत.

मलेरियाची लागण कशी होते ?

मलेरिया हा देखील डासांमार्फत पसरणारा आजार आहे. मलेरियाची लागण मादी अ‍ॅनोफिलीज हा डास चावल्यामुळे होते. पावसाळ्यातील दिवसांमध्ये या प्रचातीच्या डासांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे, पावसाळ्यात मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ होते. मलेरियाची लागण झाल्यावर त्याची लक्षणे पुढील १०-१५ दिवसांमध्ये दिसू लागतात.

मलेरियाची लक्षणे कोणती ?

  • तीव्र डोकेदुखी

  • थंडी वाजून तीव्र ताप येणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • थकवा जाणवणे

  • सतत घाम येणे

  • मळमळ आणि उलट्या होणे

  • स्नायू दुखणे

  • घसा खवखवणे

  • अस्वस्थ वाटणे

  • अ‍ॅनिमिया आणि रक्तस्त्राव होणे

World Malaria Day 2024
Dengue Fever Prevention : डेंग्यू-व्हायरल तापात रामबाण उपाय ठरतील हे 5 मसाले

डेंगूची लागण कशी होते ?

डेंगू हा एक संसर्गजन्य रोग आहे. डेंगूची लागण ही एडिस नावाचा संक्रमित मच्छर आपल्याला चावल्यावर होते. डेंगूची लागण ही प्रामुख्याने डेन-१, डेन-२, डेन-३ आणि डेन-४ या चार प्रकारच्या विषाणूंमुळे होते.

डेंगूची लागण झाल्यावर तीव्र ताप येतो. या तापाला 'ब्रेक बोन फेव्हर' असे ही म्हटले जाते. डेंगूची लागण झाल्यावर त्याची लक्षणे ही पुढील ४-७ दिवसांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे, व्यक्ती गंभीररीत्या आजारी पडते.

डेंगूची लक्षणे कोणती ?

  • तीव्र ताप

  • तीव्र डोकेदुखी

  • मांसपेशींमध्ये वेदना

  • तीव्र सांधेदुखी

  • पोटात दुखणे

  • नाकातून आणि हिरड्यांमधून रक्त येणे

  • मळमळ आणि उलट्या होणे

  • शरिरातील पेशींचे प्रमाण कमी होणे

  • रक्तस्त्राव होणे

  • त्वचेवर लाल चट्टे येणे

डेंगू आणि मलेरियाची वरील लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधा आणि वेळेवर उपचार सुरू करा. या लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.

World Malaria Day 2024
Malaria Home Remedies : डेंगू आणि मलेरियाला रोखायचे आहे ? दालचिनी आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

डेंगू आणि मलेरियामध्ये फरक काय ?

डेंगू आणि मलेरियाची लागण ही मच्छर चावल्यानंतर होते. यामध्ये डेंगूची लागण ही एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्याने होते, तर मलेरियाची लागण ही मादी अ‍ॅनोफिलीज डास चावल्याने होते.

डेंगूची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे ही मलेरियाच्या तुलनेत लवकर दिसू लागतात. डेंगूची ही लक्षणे साधारणपणे ४-७ दिवसांमध्ये दिसू लागतात तर मलेरियाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे पुढील १०-१५ दिवसांनंतर दिसू लागतात.

डेंगूची लक्षणे गंभीर दिसू लागल्यास व्यक्तीच्या हृदयाला सूज येऊ शकते आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. या उलट मलेरियाची गंभीर लक्षणे दिसू लागल्यास व्यक्तीच्या किडनीवर आणि पांढऱ्या रक्तपेशींवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

डेंगूसाठी कोणतेही ठराविक औषध नाही. मात्र, डेंगूची लागण झालेल्या व्यक्तीला या काळात शक्य तितके द्रवपदार्थ आहारात घेण्याचा सल्ला दिला जातो. या उलट मलेरियाच्या संदर्भात क्लोरोक्विन आणि हायडॉक्सीक्लोरोक्वीन अशी काही औषधे आहेत. रूग्णाची प्रकृती पाहून डॉक्टर ही औषधे रूग्णांना देतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.