Rohit Sharma: रोहित शर्मासारखे फिट राहायचे असेल तर करा रोज ३० मिनिटे 'हा' व्यायाम

Rohit Sharma Fitness Tips: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फिटनेसाठी नेहमीच चर्चेत असतो. रोहित शर्मा फिट राहण्यासाठी खुप मेहनत घेतो. तसेच आहाराचीही विशेष काळजी घेतो.
Rohit Sharma Fitness Tips
Rohit Sharma Fitness TipsSakal
Updated on

Rohit Sharma Fitness Tips: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या T20 विश्वचषकातील कामगिरीबद्दल खूप कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर लोक त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे यात शंका नाही. त्याची मेहनत आणि फिटनेस रूटीन हे त्याचे रहस्य आहे.

रोहित शर्मा फिट राहण्यासाठी खुप मेहनत घेतो. तसेच आहाराचीही विशेष काळजी घेतो. यामुळे त्यांच्या खेळादरम्यान त्यांची कामगिरी अनेक पटींनी वाढते. रोहित क्रिकेटच्या मैदानाबाहेर सायकलिंग, पोहणे, इतर खेळ खेळतो, वेट ट्रेनिंग इत्यादी देखील करतो.

रोहित शर्मा कोणता व्यायाम करतो?

रोहित शर्मा आपल्या दिवसाची सुरुवात सायकलिंगने करतो. तो दररोज किमान 30 मिनिटे सायकल चालवतो. यामुळे त्याच्या पायाचे हाडं मजबूत राहतात. तसेच शरीराची ऊर्जा देखील वाढते. तसेच क्रिकेटर्स सायकलिंग, क्रंच, पुशअप्स आणि पायांचे व्यायाम करतात. खेळताना त्यांना सतत जमिनीवर धावावे लागते, त्यामुळे ते त्यांचे खालचे शरीर मजबूत करण्याचे काम करतात. सायकलिंग हा रोहित शर्माच्या आवडत्या व्यायामांपैकी एक आहे.

Rohit Sharma Fitness Tips
World Social Media Day 2024: सोशल मीडियाच्या अतिवापराने आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम, अशी घ्या काळजी

सायकल चालवण्याचे फायदे

नियमितपणे सायकल चालवल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते.

संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असल्याने सर्व स्नायूंना मजबूत होतात.

सायकल चालवल्याने शरीर मजबूत आणि अधिक लवचिक बनते.

दररोज सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो

तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

सायकल चालवल्याने थकवा दूर होतो आणि दिवसभर उत्साही राहतो.

याशिवाय नियमित सायकल चालवण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जर तुम्हालाही रोहित शर्माप्रमाणे तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर वरील गोष्टींचा रोजच्या रूटिनमध्ये समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.