Taapsee Pannu Beauty : या गोष्टी कटाक्षाने पाळते म्हणून तर तापसीला मेकअपची गरजच नाही, नॅचरली ग्लो करतो चेहरा

मानसिक शांती तुम्हाला चिरंतन सौंदर्य प्रदान करते
Taapsee Pannu Beauty
Taapsee Pannu Beauty esakal
Updated on

Tapasee pannu Beauty :

आजकाल प्रत्येक व्यक्ती सुंदर कसे दिसता येईल, याकडे लक्ष देत आहे. यासाठी फेअरनेस क्रिम, ट्रिटमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी काम तर दमदार करते पण तिच्या चेहऱ्याला मेकअपची अजिबातच गरज नाहीय.

तापसी नेहमी चौकटीबाहेरच्या भूमिका निवडते.त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा फ्रेशनेस दिसतो. चित्रपटात आव्हानात्मक भूमिका करायला तिला आवडतात. त्यामुळे तशा कॅरेक्टरसाठी ती नेहमी तयार असते. कारण तिचे जे रूटीन आहे ते कोणत्याही क्रिमवर अवलंबून नाही.

तर ती काही सवयी आणि घरगुती गोष्टींनी मिळवलेलं चिरंतन सौंदर्य आहे. त्यामुळेच तापसीचा चेहरा ग्लोईंग दिसतो. तर आज आपण तापसीचे स्कीन केअर रूटीन काय आहे हे पाहुयात.

Taapsee Pannu Beauty
Huma Qureshi Beauty Tips: हुमा कुरेशीच्या निरोगी त्वचेचे रहस्य आले समोर, सकाळी उठून करते हे काम

त्वचेची काळजी घेते

 त्वचेच्या काळजीमध्ये क्लींजिंग, मॉइश्चरायझिंग आणि टोनिंग समाविष्ट आहे. यासाठी ती फक्त नैसर्गिक उत्पादने वापरते. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला ती विसरत नाही.

ती आठ तास झोपते

तापसी आठ तास झोप घेते. पूर्ण झोप घेतल्याने तुम्हाला शांती मिळते आणि तुम्हाला मानसिक आराम मिळतो, असे तिचे  अभिनेत्रीचे मत आहे. जे तुम्हाला नैसर्गिकरित्या सुंदर बनवते. झोप न मिळाल्याने डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. जे तुमच्या सौंदर्याला ग्रहण लावतात.

Taapsee Pannu Beauty
Beauty Tips : चेहरा टवटवीत अन् ग्लोईंग बनवायचाय तर टोमॅटो फेशिअल करा, संपूर्ण फेशिअल ट्रिटमेंट घरच्या घरी

तापसी घरगुती उत्पादनांवर विश्वास ठेवते

त्वचेच्या काळजीसाठी तापसी घरगुती उत्पादनांवर अधिक विश्वास ठेवते. तिला तिच्या चेहऱ्यावर दूध, मलई, बेसन आणि दही यांचे फेस पॅक लावायला आवडते. याशिवाय ती कोरफड आणि टोमॅटोचा फेस पॅक देखील लावते.

एक्सफोलिएशनकडे ती लक्ष देते

तापसीला नैसर्गिक उत्पादनांनी स्क्रब करायला आवडते. तिचा असा विश्वास आहे की एक्सफोलिएशनमुळे तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात. त्यामुळे चेहरा डागरहित आणि चमकदार दिसतो.

Taapsee Pannu Beauty
Beauty Tips : स्ट्रेचमार्क जात नाहीत तर लपवा, या तीन पद्धती येतील कामी

ओठांसाठी हे करते तापसी

त्वचेसोबतच ती ओठांच्या स्वच्छतेकडेही खूप लक्ष देते. हवामानातील बदलामुळे ओठ कोरडे होतात आणि पटकन तडतडायला लागतात. त्यामुळे दररोज ओठांना मॉइश्चरायझ करा आणि लिप स्क्रबचाही वापर करा, असे ती सांगते.

शरीर हायड्रेट ठेवते

हायड्रेटिंग आणि डिटॉक्सिफिकेशन तापसी तिची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन आणि हायड्रेशनवर खूप लक्ष केंद्रित करते. ती भरपूर पाणी आणि ताज्या फळांचे रस पिते. तापसी तिची त्वचा आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी पिते. तापसी ग्लूटेन आणि लैक्टोज फ्री फूडला जास्त महत्त्व देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.