तुम्ही कोरोना रुग्णाची देखभाल करताय का? मग या गोष्टींची घ्या खबरदारी

take these precautions if you are taking care of a corona positive patient
take these precautions if you are taking care of a corona positive patient
Updated on

सध्या जगभरात कोरोना (Corona) व्हायरसने थैमान घातले आहे, आपल्यापैकी अनेकांच्या आजूबाजूला देखील अनेक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी हा काळ खूप कठीण आहे, कारण हा आजार तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास देऊ शकतो.

स्वतःला फक्त एका खोलीत बंद करून फक्त एका खोलीत बंदिस्त राहणे खूप कठीण जाते. एकदा एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली की, त्याला/तिला मानसिक आरोग्य आणि चिंता या समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून जेवन करु शकत नाहीत, ना त्यांच्याशी बोलू शकता. मात्र, कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी देखील ही काळ कठीण आहे. रुग्णाची काळजी घेण्यासोबतच त्यानांही स्वतःला कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही कोरोना ग्रस्त व्यक्तीची काळजी घेत असाल किंवा घेणार असाल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही कोरोना रुग्णाची काळजी घेत असाल तर सतत कोमट पाणी प्या, विश्रांती घ्या, फ्रेश रहा, मास्क घाला, सोशल डिस्टंसींगचे पालन करा आणि कोणत्याही संभाव्य संक्रमित वस्तूला स्पर्श केल्यानंतर लगेच हात साबणाने धुवा. यासोबतच, बाधित व्यक्तीची भांडी धुताना हातमोजे घाला आणि गरम पाण्याचा वापर करा. आपले हातमोजे काढल्यानंतर आणि ते स्वच्छ केल्यानंतर आपले हात चांगले धुवा.

take these precautions if you are taking care of a corona positive patient
शाकाहारामुळे सेक्सवर काय परिणाम झाला?, महिला पत्रकाराने सांगितला अनुभव

या गोष्टी करत राहा

1) प्रत्येकाने कोमट पाणी वारंवार प्यावे आणि कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाकून गार्गल करावे.

२) ताजे अन्न खावे आणि सहज पचेल असे अन्न खावे.

३) झोपेची पूर्ण काळजी घ्या किमान 7-8 तासांची झोप घ्या.

4) दिवसातून एकदा ओरेगॅनो, पुदिना आणि निलगिरी तेलाचे 1-5 थेंब टाकून वाफ घ्या.

५) रोज किमान 30 मिनिटे योगासने करा आणि ध्यानाचा सराव करायला विसरू नका.

take these precautions if you are taking care of a corona positive patient
रात्री मुली मोबाइलवर काय सर्च करतात? चार गोष्टी आहेत फेव्हरेट

तुमची इम्युनिटी वाढवा (Boost Your Imunity)

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद, जिरे, धणे आणि लसूण यांसारख्या मसाल्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि बेदाणे यापासून बनवलेला हर्बल चहा दिवसातून एक किंवा दोनदा प्या. हवे असल्यास त्यात गूळ आणि लिंबू घाला.

अर्धा चमचा हळद पावडर एका ग्लास कोमट दुधात मिसळा. हे दिवसातून दोनदा प्यायल्याने संसर्ग टाळता येतो.

take these precautions if you are taking care of a corona positive patient
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()