Ice Bath Benefits: पाण्यात बर्फ टाकून अंघोळ केल्यास मिळतात हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याची पद्धत अलीकडच्या काळात लोकप्रिय झाली असली तरीही ही पद्धत फार पूर्वीपासूनच वापरली जात आहे.
ice bath
ice bathsakal
Updated on

निरोगी शरीरासाठी दररोज आंघोळ करणे चांगले आहे असे म्हणता येत असले तरी, तुम्ही कधी बर्फाच्या पाण्याने आंघोळ केली आहे का? बर्फाच्या पाण्याने आंघोळ करणे म्हणजे आइस बाथ म्हणजे पाण्यात बर्फ टाकून आंघोळ करणे. सामान्य भाषेत त्याला कोल्ड वाटर इमर्शन म्हणतात.

तुम्ही लोकांना बर्फाच्या तलावात बर्फाच्छादित ठिकाणी डुबकी मारताना पाहिले असेल आणि असे व्हिडिओ लोकांना रोमांचित करतात. बर्फाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

आइस बाथ म्हणजे काय?

आइस बाथ म्हणजे, एखादी व्यक्ती पाण्यात बसते किंवा आंघोळ करते ज्याचे तापमान सुमारे 50-59 अंश फॅरेनहाइट म्हणजेच 10-15 अंश असते. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आईस बाथमध्ये दहा मिनिटे बर्फाळ पाण्यात राहावे लागते.

ice bath
Vitamin B12 deficiency: व्हिटामीन B-12 ची कमतरता दूर करतील हे पदार्थ; आसपासही भटकणार नाहीत आजार

आइस बाथचे फायदे

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आईस बाथ केल्याने स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि टिश्यूज पेन यामध्ये खूप आराम मिळतो. विशेषत: जे लोक खेळांमध्ये सक्रिय असतात, किंवा बॉडी बिल्डर्स इ. त्यांच्या स्नायूंच्या वेदना आणि टिश्यूंना आराम देण्यासाठी आइस बाथ करतात. या आईस बाथमुळे टिश्यू आणि स्नायूनां सूज, वेदना आणि लालसरपणामध्ये खूप आराम मिळतो.

ice bath
Eye Health: या कारणांमुळे डोळ्यांची दृष्टी वेळेआधीच होतेय कमकुवत?,वेळीच लक्ष द्या!

आईस बाथमुळे झोप आणि मेंदूच्या कमतरतेपासून आराम मिळतो

जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा निद्रानाश होत असेल तर बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो. आईस बाथने मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि मनाला खूप विश्रांती मिळते. याशिवाय उष्णता आणि आर्द्रतेपासून आराम मिळवण्यासाठी आईस बाथ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जे लोक तणावाचा सामना करत आहेत, त्यांना आईस बाथचा विशेष फायदा होऊ शकतो. आईस बाथने कमकुवत पचनशक्ती मजबूत होते आणि शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.