Tea benefits For Glowing skin : तजेलदार त्वचा अन् वजन कमी करण्यासाठी चहा प्या!

तो चहा नॉर्मल दुधाचा न करता तो बडिशेफचा असावा
Tea benefits
Tea benefitsesakal
Updated on

चहा हे एक पेय नसून ती एक संस्कृती आहे असे म्हणायला काही हरकत नाही. देशभरात तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला चहा मिळू शकेल फक्त त्याचे स्वरूप वेगळे असेल. बदलत्या काळानुसार चहाचे स्वरूपदेखील बदलत आहे. चहाने वजन वाढते, उष्णता होते हे जरी खरे असले. तरी चहाचे अनेक फायदेही आहेत.

चहा पिल्याने वजन कमी होते आणि चेहराही तजेलदार होतो, असे कोणी तूम्हाला सांगितले. तर, तूम्ही आम्हाला वेड्यात काढाल. फक्त तो चहा नॉर्मल दुधाचा न करता. तो बडिशेफचा असावा. तरच हे फायदे मिळतात.

- जर तुमचे वजन कमी करायचे असल्यास रोजच्या डाएटमध्ये बडीशेफपासून बनविलेला चहा प्यायला विसरू नका. या चहामध्ये असणाऱ्या फायबरमुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील.

- बडीशेफपासून तयार केलेला चहा प्यायल्याने तुमची पचन व्यवस्था सुरळीत चालू राहण्यास मदत होते.

- या चहाच्या नियमीत सेवनाने डोळ्यांची जळजळ व डोळ्यांनी धुरकट दिसण्याची समस्या लगेच दूर होते.

Tea benefits
Rahul Shewale: “स्वत: शेण खाता अन् ....शेवाळेंच्या दाव्यानंतर रुपाली ठोंबरे संतापल्या

- चहामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट या घटकांमुळे चेहेऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या दूर होईल.

 - दगदग आणि धावपळीमूळे त्वचा काळी पडते. त्यामूळे नियमीत बडिशेफचा चहा प्यायल्याने त्वचा गोरी होते.

कसा बनवायचा हा चहा

दीड कप पाण्यात अर्धा चमचा बडीशेप मिसळा आणि चांगली उकळा. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये दालचिनी मिसळून तुम्ही ते अधिक चवदार बनवू शकता. चहा चांगला उकळला की. नंतर गाळणीच्या मदतीने चहा गाळून घ्या. त्यामध्ये मध मिसळून चहा प्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.