Tea Side Effects : दूधाचा चहा तुमच्या जीवावर उठलाय; वेळीच चहाचं व्यसन सोडा, वाचा काय म्हणतो रिसर्च

सिंघुआ विद्यापीठ सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सर्वेक्षणातील दावा
Tea Side Effects
Tea Side Effectsesakal
Updated on

Tea Side Effects :

चहा म्हणजे अनेक लोकांसाठी जीव की प्राण आहे. कॉफी पिणाऱ्या जगात एकटा आपला देश चहाप्रेमी आहे. हे वेड भारतापुरते मर्यादीत राहीलेले नाही. तर, हे वेड परदेशातही पोहोचले आहे. भारतातल्या अनेक तरूण मुलांनी परदेशात ‘चायवाला’चे स्टार्टअप केले आहेत.

पण, हाच चहा आपल्या शरीरासाठी चांगला आहे का, याचा विचार आपण कधी केलाय का?. चहा हे पेय आपल्याकडे पुर्वापार चालत आले आहे. पूर्वी एक काढा म्हणून वापरले जायचे पण ते आता एनर्जी ड्रिंक म्हणून पाहिले जाते. कडक चहा घेतल्याशिवाय तरतरी येत नाही, असे अनेक लोक म्हणतात. पण हेच तरतरी आणणारं पेय तुमच्यासाठी बाधक ठरत आहे.

Tea Side Effects
Tea with Snacks : चहासोबत स्नॅक्स खाताय? मग 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

असे आम्ही नाही तर, सिंघुआ विद्यापीठ आणि चीनच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स यांनी एक सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. यामध्ये चीनमधील सुमारे 5000 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

त्यांचे असे म्हणणे आहे की, दुधाचा चहा घेतला तर आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दुधाच्या चहामुळे व्यसन तर होतेच पण त्यामुळे नैराश्य किंवा चिंता वाढण्याचा धोकाही निर्माण होतो, असेही स्पष्ट झाले आहे.

एकाकीपणा वाढतो

या अभ्यासात असेही आढळून आले की, दुधासोबत चहा पिण्याचा एक परिणाम म्हणजे एकटेपणा. याशिवाय चहामध्ये साखर मिसळल्याने तणाव किंवा नैराश्य वाढते. संशोधकांचे म्हणणे आहे की चीन किंवा इतर ठिकाणी लोक त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी चहाचा वापर करत आहेत.

Tea Side Effects
Dark Tea For Diabetes : डायबटीजवाल्यांनो बिनधास्त प्या चहा आणि शुगर कंट्रोल करा; कसं ते वाचा

या चहाचे व्यसन त्यांना सोशल मीडिया किंवा ड्रग्जइतकेच नुकसानकारक ठरू शकते. या प्रकारच्या चहाचे व्यसन लागल्यानंतर, काही लक्षणे दिसतात ज्यात तृष्णा, चहा सोडू न शकणे आणि सतत चहा प्यावेसे वाटणे यांचा समावेश होतो.

चहामुळे होणाऱ्या इतर समस्या

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चहामध्ये असलेले कॅफीन इतर आरोग्य समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते. कॅफिनमुळे शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. अशा स्थितीत तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर ते प्यायल्याने निद्रानाशाची समस्या देखील होऊ शकते. स्लीपिंग डिसऑर्डर म्हणजेच निद्रानाशामुळेही तणाव किंवा नैराश्य वाढते.

Tea Side Effects
Facts About Tea : उरलेला चहा परत गरम करून पिणे किती योग्य? वाचा सविस्तर

यापासून दूर रहा

चहाची सवय सोडण्यासाठी तुम्ही त्याऐवजी इतर पेये पिण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही लिंबूपाणी सारखे पेय वापरून पाहू शकता. याशिवाय जेव्हाही तुम्हाला चहाची तल्लफ असेल तेव्हा एक ग्लास पाणी प्या. चहा एकाच वेळी सोडणे शक्य नाही, परंतु हळूहळू त्यापासून दूर राहणेच योग्य ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.