Height Increase Tips : या उपायांनी वाढेल Teen Agers ची उंची

वयानुरूप उंची वाढणे महत्वाचे असते
Height Increasing Tips teenage
Height Increasing Tips teenage
Updated on

Height Increasing Tips: वयानुरूप उंची वाढणे महत्वाचे असते. काही मुलांची उंची झरझर वाढते. तर काहींना उंची वाढण्यासाठी वेळ लागतो. अल्पवयीन मुलांची उंची योग्य तितकी वाढली नाही तर ते जास्त हिरमुसतात. त्यांना काही वेळा घराबाहेर चिडवाचिडविला सामोरे जावे लागते. मग उंची वाढण्यासाठी मुलं आणि पालक खूप प्रयत्न करतात. काही जण विविध सप्लिमेंट पिऊन उंची वाढविताना दिसतात. या पेयांमुळे कदाचित त्यांचे नुकसान होऊ शकते. पण, काही उपायांनी टीनएजनंतरही उंची वाढू शकते. त्यासाठी सोपे उपायही फायद्याचे ठरू शकतात.

Height Increasing Tips teenage
वेगे वेगे चाला वजन कमी करा! Art Of Walking समजून घ्या
 kids doing yoga
kids doing yoga

नियमित व्यायाम करा- नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली करत राहिल्याने तुमच्या मणक्याला ताकद मिळते. तुम्ही नीट पाहिल्यास, दिवसभरापेक्षा झोपताना तुम्ही उंच दिसता. त्याचे कारण म्हणजे दिवसभर तुम्ही उभं राहून काम करत असता. तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीराच्या भारामुळे मणका दाबला जातो. त्यामुळे तुम्ही आणखी लहान दिसायला लागता. अशी परिस्थिती टाळण्यासाठी व्यायाम केल्याने खूप फायदा होतो. काही व्यायाम मणका मजबू करतात. यात स्ट्रेचिंग, हॅंगिग अशा व्यायामांचा फायदा होतो. मुलांच्या वाढीसाठी स्ट्रेचिंग व्यायाम महत्वाचा आहे. यासाठी तुम्ही दररोज सूर्यनमस्कार घालू शकता.

Height Increasing Tips teenage
Knee Pain : तुमचे गुडघे दुखतात का? संशोधकांनी सांगितला उपाय!
Students Eating Food
Students Eating FoodSakal

चांगला आहार- अल्पवयीन मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांचा आहार पौष्टीक असावा. त्यांना दूध, ताजी फळं, हिरव्या भाज्या अशा पौष्टीक घटकांनी समृद्ध पदार्थ खायला द्यावेत. या पदार्थांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स इतर घटक आढळतात. ते तुमच्या मुलाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांची चयापचय क्रियाही सुधारते.

Height Increasing Tips teenage
८ तास झोपणे महत्वाचे नाही! झोपेची गुणवत्ता ठरते महत्वाची| Study
Sleep
Sleep

भरपूर झोपणे गरजेचे - झोपेच्या वेळी पिट्यूटरी ग्रंथी चांगले कार्य करतात. म्हणून या मुलांच्या चांगल्या शारीरिक वाढीसाठी, पूर्ण झोप मिळणे गरजेचे आहे, झोपताना त्यांची विशेष काळजी घ्या. त्याची उशी डोक्याऐवजी गुडघ्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा अवस्थेत झोपल्यामुळे त्याच्या मणक्यावर कोणताही दाब येणार नाही. याशिवाय, हा एक स्ट्रेच आहे, ज्याचा मुलाच्या उंचीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. याशिवाय अशाप्रकारे झोपल्याने पाठदुखी कमी होते.

Height Increasing Tips teenage
'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.