Children in love at a young age : सरकारने प्रौढ होण्याचं, लग्न करण्याचं वय ठरवून दिलं आहे. साधारण त्या वयात तुमचं प्रेम स्वीकारार्ह समजलं जातं. पण ज्या वयात अभ्यास, खेळ यावर मुलांनी लक्ष केंद्रित करण योग्य असतं त्यावयात मुलं प्रेमात पडत असल्याचं दिसू लागलं आहे.
टीव्ही, सिनेमा, इंटरनेट यामुळे फार कमी वेळात मुलांना अनावश्यक गोष्टी माहित होतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय हे कळण्या आधीच गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड घेऊन ही मुलं फिरतात. अशावेळी पालकांनी हे कसं हाताळावं हा मोठा प्रश्न आहे. परिणामी पालक आणि मुलांमधील संबंध खराब होतात.
मुलं कमी वयात शिक्षण सोडून जर प्रेमप्रकरणं करत असतील तर पालकांसाठी खूप मोठी गोष्ट असते. मुलांचे प्रेमसंबंध माहित झाल्यास अनेक पालक निराश होतात काही पालक तर मुलांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणतात. अशाने मुलं पालकांशी काहीही शेअर करायला घाबरतात. त्यांच्याविषयी मनात राग धरता. परिणामी पालक आणि मुलांमधील संबंध खराब होतात.
मुलं वयात येतानाच प्रेमात पडली तर
शक्यातो पालकांनी सगळ्यात आधी किशोरवयीन मुलं त्या वयात प्रेमासारख्या संकप्लनेकडे लवकर आकर्षित होतात. हे वय असंच आहे जिथं चुका सर्वांकडूनच होतात. पण, अशा वेळी मुलांच्या चुकीवर चर्चा न करता पालकांनी त्यांच्या भावनांचा सन्मान करावा. याचा अर्थ असा नाही की मुलांना प्रेम संबंध ठेवायला परवानगी द्यावी. अशा वेळेस मुलांना तुम्ही विश्वासात घेऊन समजावू शकता.
पालकांनी मुलांशी बोलताना कोणती काळजी घ्यावी
1. या सर्व प्रकरणांमध्ये, कधीकधी मुलांना पालकांच्या आधाराची खूप गरज असते परंतु पालक मुलांवर राग व्यक्त करत असतात. अशाने मुलांचे मनोधैर्य कमी होते.
2. मुलांचे प्रेमसंबंध माहित झाल्यास पालकांनी त्यांना समजावून सांगावं. त्यांचा मुद्दा शांतपणे ऐकावा.
3. जेव्हा पालकांना मुलांच्या प्रेमसंबंधांविषयी कळते तेव्हा त्यासाठी स्पष्ट नकार न देता मुलं स्वप्नांना प्राधान्य कसं देतील याचा विचार करावा.
4. मुलांसोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्यांना समजून घ्यावं. त्यांना विचार करायला वेळ द्यावं. मुलांच्या आयुष्यात प्रमाणाहून जास्त ढवळाढवळ करु नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.