Temple jewelery च्या धर्तीवर टेंपल साडीची हवा!

Temple Saree: हि ट्रेंडी साडी तूमच्या कपाटात असलीच पाहिजे
Trendy saree
Trendy sareeesakal
Updated on

Temple Saree: भारतीय महिला असे ज्यावेळी आपण ऐकतो तेव्हा साडी नेसलेली महिला आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येते. परदेशी महिलांमध्येही साडीची क्रेझ हळूहळू निर्माण झाली आहे. भारतात साड्यांचे हजारो प्रकार आहेत. आता या प्रकारात आणखी एक नव्या कोऱ्या डिझाईनची भर पडली आहे.

या डिझाईनचे नाव टेंपल डिझाईन असे असून त्यावर बारीक काम केलेले देवांचे चित्र असणार आहे.याच साडीबद्दल जाणून घेऊयात. आज आम्ही तूम्हाला तामिळनाडूच्या प्रसिद्ध कोनराड साडीबद्दल सांगणार आहोत.

या साडीला मंदिर साडी असेही म्हणतात. ही साडी प्रामुख्याने तमिळनाडूच्या पूर्वेकडील आर्नी, कांचीपुरम, कुंभकोणम, रासीपुरम, सेलम, तंजावर आणि तिरुभुवनम या भागात बनवली जाते.

राधा कृष्ण डिझाईन
राधा कृष्ण डिझाईन esakal
Trendy saree
Sonalee's Saree: गॅरंटी! हृदयाचे ठोके चुकल्यावाचून राहाणार नाही

या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हाताने विणलेली असून तिचे विणकाम इतर साड्यांच्या विणकामापेक्षा खूपच किचकट आहे.

कोनराड साड्यांमध्ये सुंदर नैसर्गिक घटक, वनस्पती आणि जीवजंतूंनी प्रेरित असलेल्या खास डिझाईन्स आहेत. या साडीला पट्टू किंवा कंपी असे म्हटले जाते.

साडीवरील आकर्षक बाळकृष्ण
साडीवरील आकर्षक बाळकृष्णesakal
Trendy saree
Lehenga Saree : नजर हटणार नाही असं खास लूक देईल लेहेंगा साडीचं हे कलेक्शन, तेही परवडणाऱ्या किमतीत

साडीच्या बॉर्डरवर खास अशी ३ सेमीची डिझाईन असते. त्यामूळे या साडीला वेगळा लुक येतो. याला टेंपल किंवा मुभम साड्या देखील म्हणतात. कारण या साड्यांवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध अशा मंदिराचे स्वरूप देखील आहे.

Trendy saree
Saree Care Tips : प्रत्येकीचा हट्ट 'एक शालू बनारसी'; पण,त्याची काळजी कशी घ्याल?

या साड्यांची वैशिष्ठ्ये  

या साड्यांच्या बॉर्डरची रुंदी 10 ते 14 सेमी पर्यंत असते. हे कंपियूर पट्टू म्हणून ओळखले जातात. याला खूप पातळ सीमा असतात. पारंपारिकपणे हाताने विणलेल्या, कोनराड साडीच्या किनाऱ्यावर चेक किंवा पट्टे असलेला नमुना असतो.

 साडीच्या शेवटच्या भागावर किंवा पल्लूवर सोनेरी धाग्याचे भरतकाम असते. या साडीच्या सध्याच्या डिझायनर सिरीजमध्ये जरीचे काम करून साडी थोडी लांब केली जाते. या प्रकारच्या साडीमध्ये तुम्हाला अनेक कलर उपलब्ध आहेत.

जाड बॉर्डर डिझाईन
जाड बॉर्डर डिझाईनesakal
Trendy saree
Sequins Saree : प्रत्येक पुरूषाला वाटतं आपल्या पत्नीने ही साडी नेसावी!

कोणतीही साडी स्पेशल तेव्हाच बनते जेव्हा तिच्यावर एखादी नक्षीकाम केले जाते. आपल्या मराठी पैठणीचीही खासियतही तिच्यावर असलेले मोराचे नक्षीकाम हेच आहे. या डिझाईनमध्ये तुम्हाला मंदिरे, प्राणी, पक्षी यांचे डिझाईन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.