का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?

का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?
का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?
का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?Sakal
Updated on
Summary

जेवल्यावर नक्कीच चालायला हवं, असं तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं आणि वाचलंही असेल.

जेवल्यावर नक्कीच चालायला (Walking) हवं, असं तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं आणि वाचलंही असेल. त्यामुळे अन्न सहज पचते, त्याचबरोबर अन्न खाल्ल्यानंतर चालण्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते. अनेकांना प्रश्‍न पडतो, की जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने खरंच अन्न लवकर पचतं (Digest) का? याचे उत्तर असे, की जेवल्यानंतर चालण्याने अन्न पचतेच पण पोटाची चरबीही (Fat) वाढत नाही. चला जाणून घेऊया कसे ते...

का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?
वारकऱ्यांसाठी खुषखबर! आरोग्यमंत्री म्हणाले, कार्तिकी वारीला परवानगी

जेवल्यानंतर चालण्याने अन्न असे पचते...

तुम्ही जेवल्यानंतर ऍक्‍टिव्ह होत काही काम करण्यास सुरवात केली, तर तुमचे शरीर पोषक तत्त्वे शोषून घेते. अन्नपचनाचा एक महत्त्वाचा भाग लहान आतड्यात असतो. संशोधनात असे दिसून आले आहे, की जेवणानंतर चालण्यामुळे पोटातून आणि लहान आतड्यात अन्नाचे जलद संक्रमण होते. तुमच्या पोटातून लहान आतड्यात जितके जलद अन्न हलते, तितकेच तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि ऍसिड रिफ्लक्‍स यांसारख्या सामान्य समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता कमी असते. संशोधनानुसार, जेवणानंतर 30 मिनिटे चालणे व व्यायामासारख्या क्रियांमुळे तुमची पचनशक्ती सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची शक्‍यता कमी असते. तसेच पोटाची चरबीही वाढत नाही.

का खरंच जेवण झाल्यावर फेरफटका मारल्याने अन्न सहज पचते?
यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाचे 63 मुहूर्त

अन्न पचनासह 'हे' आहेत फायदे

जेवणानंतर चालणे या क्रियेमुळे केवळ तुमची पचनशक्ती सुधारेल असे नाही, तर रोजच्या तंदुरुस्तीसाठी आवश्‍यक असलेल्या दहा हजार स्टेप्सचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही मदत करू शकते. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन किंवा फील-गुड हार्मोन्स देखील रिलीज होतात, जे शरीराला आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे जेवण झाल्यावर फिरायला नक्की जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.