एकत्रीकरणाचा ‘योग’

मी गेल्या १६ वर्षांपासून योग करत आहे; पण कोविड काळापासून योग शिकवणीकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरात बसले होते. बाहेर पडून काही करता येत नव्हते, त्यावेळी मी कोरोना वॉरियर म्हणून काम करत होते. अनेक वर्कशॉप्स घेत होते, सीनियर सिटीझनना मदत करत होते.
एकत्रीकरणाचा ‘योग’
एकत्रीकरणाचा ‘योग’sakal
Updated on

मधुरांगण

सायली शिंदे.संस्थापक, योग विथ सायली

मी गेल्या १६ वर्षांपासून योग करत आहे; पण कोविड काळापासून योग शिकवणीकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरात बसले होते. बाहेर पडून काही करता येत नव्हते, त्यावेळी मी कोरोना वॉरियर म्हणून काम करत होते. अनेक वर्कशॉप्स घेत होते, सीनियर सिटीझनना मदत करत होते. मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये तेथील लोकांच्या मागणीनुसार तिथे योग घ्यायला सुरुवात केली. ते दोन ते तीन महिने व्यवस्थित चालले होते; परंतु पहिली कोरोनाची लाट गेल्यानंतर आमच्या सोसायटीत कोरोना पॉझिटिव्हची केस सापडली. त्यानंतर ऑफलाइन सर्वच गोष्टी पुरेपूर थांबल्या. त्यावेळी माझी २१ दिवसांची वेटलॉसची बॅच सुरू होती. साधारण पाच ते सहा दिवस झाले होते. सर्व ऑफलाइन भेटी पूर्णपणे थांबल्या होत्या. तेव्हा मला काय करावे ते सुचत नव्हते- कारण बॅच कंप्लीट करणे तेवढेच महत्त्वाचे होते. तेव्हा मी ऑनलाईन पर्याय सुचवला आणि ती बॅच पुन्हा सुरू केली. तेव्हापासून ऑनलाईन योगा क्लास घेण्याचे सुरू झाले, ते थांबलेच नाही. मी समाजमाध्यमांवर पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह असल्यामुळे मी बऱ्याच स्त्रियांना ऑलरेडी जोडली गेलेली होते. त्यामुळे ऑनलाईन बॅचसाठी बऱ्याच एन्क्वायरी यायला लागल्या. आतापर्यंत जवळजवळ सात ते आठ हजार स्त्रिया माझ्याकडून योगाभ्यास शिकल्या आहेत. मी आधीपासूनच योगशिक्षक असल्यामुळे कोविडपासून माझा ऑनलाइन सुरू झालेला प्रवास, त्याचबरोबर मिळणारा प्रतिसाद मला अचंबित करणारा होता.

हे योग वर्ग फक्त आणि फक्त महिलांसाठी आहेत. मी सर्व महिलांशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे. माझे व्हॉट्सअपवर विविध तेरा ग्रुप आहेत. माझ्याकडे योग शिकण्यासाठी आलेला महिलांना स्त्रियांची निगडित असलेल्या अनेक समस्यांवर मार्गदर्शन केले आहे; तसेच त्यांना त्या समस्येतून बाहेरही काढले आहे. त्यामुळे स्त्रियांशी माझे नाते विशिष्ट पद्धतीने जोडले गेले आहे. तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही महत्त्वाचे काम या प्रशिक्षणातून केले जाते. हेल्दी लाइफस्टाईल, पीसीओडी, पीसीओएस, थायरॉईड, मेनोपॉज, प्री मेनोपॉज अशा अनेक समस्यांवर महिलांसाठी काम करत आहे. यावर वेगवेगळी मार्गदर्शनपर सत्रेही दर आठवड्याला होतात.

सकाळी आणि सायंकाळी अशा मिळून आठ बॅचेस सध्या सुरू आहेत. अनेक महिला व मुली परदेशातून; तसेच भारतातील विविध राज्यांतून जोडलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या प्रत्यक्ष भेटी कमी होतात. त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन ॲक्टिविटींचे आयोजन करतो. हे सर्व उपक्रम त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी राबवले जातात. प्रत्येक स्त्रीने छंद जोपासलाच पाहिजे, कारण मेनोपॉजच्या काळात स्त्रियांना खूप त्रास होतो. स्त्रियांची चिडचिड होत असते, त्यांना एकटेपणा जाणवतो, त्यावेळी त्यांना यातून बाहेर येण्यासाठी छंद मदत करतात. मी नेहमी म्हणते, की मानसिक अस्वस्थतेमधूनच ७० टक्के शारीरिक आजार होत असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे मानसिक स्वास्थ चांगले असणे गरजेचे असते.

योगविषयक क्लाससोबतच आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ट्रिप्सचेही आयोजन करतो. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. वर्षातून एकदा गेट-टुगेदर भरवतो; तसेच योग दिनानिमित्त अथवा महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन केले जाते. आमचा महिलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, यामध्ये जवळजवळ आठशे महिला आहेत. त्या सेलर्स आहेत. त्या स्त्रिया त्यांचा व्यवसाय या ग्रुपच्या माध्यमातून प्रमोट करतात. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी याचा फायदा त्यांना होतो. मला प्रत्येक स्त्रीला हे सांगावेसे वाटते, की तिने सजग राहणे फार आवश्यक आहे. तिच्या हातात घराची दोरी असते. तुमची निवड चांगली असणे फार महत्वाचे आहे.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com