High Heels Wearing Tips: हाय हिल्स घालत असाल तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका

बहुतेक मुलींना हाय हिल्स घालायला आवडतात.
High Heels
High Heelssakal
Updated on

बहुतेक मुलींना हाय हिल्स घालायला आवडतात. ट्रेडिंग फॅशनपासून व्यक्तिमत्त्व वाढवण्यापर्यंत, हाय हील्स प्रत्येक गोष्टीत चांगली भूमिका बजावतात. अनेकवेळा अनेक मुलींना इच्छा असूनही हाय हिल्स कॅरी करता येत नाही. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून तुम्ही सहज हाय हिल्स घालू शकता. जाणून घेऊया या टिप्सबद्दल.

हाय हिल्स न घालण्याची कारणे : बहुतेक मुलींना हाय हिल्स न घालण्याची सवय नसते. पण असे असूनही फॅशनमुळे ती खास प्रसंगी हाय हिल्स घालते. यामुळे अनेकवेळा त्यांचे पाय ताणले जातात आणि वेदना सुरू होतात. त्यामुळे मुलींना खूप अस्वस्थ वाटते आणि त्या हाय हिल्स घालणे टाळू लागतात. म्हणूनच कोणत्याही खास प्रसंगी हील्स घालण्यापूर्वी त्याची चांगली सवय करून घेणे आवश्यक आहे.

High Heels
Sleep Quality: रात्री लवकर झोप लागत नाही, मग आजच बंद करा या सवयी, अंथरूणात जाताच सेकंदात येईल झोप

साईजकडे लक्ष देणे आवश्यक आहे: घाईघाईने कधीही हाय हिल्सची खरेदी करू नका, यामुळे तुम्ही साईज आणि कम्फर्टकडे योग्य लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही हाय हिल्सची खरेदी करायला जाल तेव्हा ते घाला आणि साईज नीट तपासा. ते आरामदायक आहेत की नाही हे देखील पहा. चांगल्या ब्रँडच्या हाय हिल्सची निवड केल्यास ते अधिक चांगले होईल.

हळूहळू हाय हिल्सची सवय लावा: कोणत्याही खास प्रसंगी अचानक हाय हिल्स घालणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू हाय हिल्स घालण्याची सवय लावा. घरी परिधान करून चांगला सराव करा. यानंतरच हाय हिल्स घालून बाहेर जा.

High Heels
Periods Tips While Travelling : प्रवास करताना मासिक पाळी येणं Irritate होतं यार? या टिप्स आजमवा आराम मिळेल!

ब्लॉक हील्सपासून सुरुवात करा: थेट हाय हिल्स घालणे तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकते. म्हणूनच आधी ब्लॉक हिल्स असलेली हील्स घालण्याची सवय लावली पाहिजे. यानंतर, जेव्हा तुम्हाला ते परिधान करण्यास आरामदायक वाटू लागते, तेव्हा हाय हिल्स ट्राय करा. हाय हिल्स घालताना, हे देखील लक्षात ठेवा की तुमचा जोर अंगठ्याऐवजी टाचांवर असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.