Pneumonia: न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. हे संक्रमण सामान्यत: बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होतात. या संसर्गामुळे तुमच्या फुफ्फुसात सूज वाढते. फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या द्रवाने भरू शकतात, ज्यामुळे रूग्णांना श्वास घेणे कठीण होते. न्यूमोनियाचे अनेक प्रकार असले तरू सर्वात सामान्य म्हणजे न्यूमोकोकल न्यूमोनिया. हे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जीवणूमुळे होते. न्यूमोनिया रूग्णांना सौम्य आणि गंभीर दोन्ही प्रकारात प्रभावित करते. १२ महिने किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसह आणि ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसह काही लोकांसाठी न्यूमोनिया जीवघेणा ठरू शकते. त्याचवेळी जर तुम्हाला वारंवार सर्दी आणि फ्लूचा त्रास होत असेल तर ते न्यूमोनियाचे लक्षण असू शकते. निमोनियाची वेळेवर ओळख न झाल्यास अनेक आजार होऊ शकतात. न्यूमोनिया कसा ओळखायचा ते जाणून घेऊया?