Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा

लगीन गाठ आयुष्यभरासाठी असते. पण प्रत्यक्ष आयुष्यात दरवेळीच असं नाही जाणवत. प्रत्येकाचं मॅरिड लाइफ चित्रपटांइतकी रोमँटिक नसतं.
Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Updated on

Reasons Of Divorce : असं म्हणतात जोड्या स्वर्गात बांधल्या जातात. यात बांधली गेलेली लगीन गाठ आयुष्यभरासाठी असते. पण प्रत्यक्ष आयुष्यात दरवेळीच असं नाही जाणवत. प्रत्येकाचं मॅरिड लाइफ चित्रपटांइतकी रोमँटिक नसतं. थोडे फार वाद, भांडणं नात्यात प्रेम वाढवतात असं म्हणतात. पण त्याचं प्रमाण आणि तीव्रता तुमच्या नात्याचं आयुष्य ठरवतं.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips: 'या' गोष्टी जाणवतात का? जर हो तर हीच ब्रेकअपची वेळ

याचा वेळीच समतोल साधला नाही तर कधी कधी हे नाते तुटण्याच्या मार्गावर येते. जेव्हा संबंध आधीच नाजूक टप्प्यातून जात असतात तेव्हा अशी परिस्थिती अधिकच नाजूक बनते. अशा परिस्थितीत, संकेत समजून घेणे खूप महत्वाचं आहे जे तुम्हाला हे सांगण्यास मदत करतात की आता तुम्ही तुमचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करणं थांबवावं.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips : 'या' पुरूषांचे Love Life टिकते दीर्घकाळ

या 5 गोष्टी देतात संकेत

लग्नानंतर नात्यात समस्या येणे ही मोठी गोष्ट नाही पण ती समस्या न सुटणे ही मोठी गोष्ट आहे. काहीजण या वर मार्ग काढतात तर काहींना काढता येत नाही आणि गोष्टी अधिक ताणल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या संकेत देतात की हे नातं आता संपलं आहे.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips : नवरात्रीत Sex करावा का?

संवाद संपणे

संवाद हा नात्याचा एक महत्त्वाचा धागा असतो. कितीही काहीही झालं तरी संवाद संपला नाही पाहिजे. भले एकमेकांशी भांडा पण बोलणे टाकू नका. ज्या कपल्समध्ये बोलणेच होत नाही त्यांचे हळूहळू एकमेकांबद्दलचे मत बदलत जाते. हळूहळू दोघेही नात्याबद्दलच्या अपेक्षा सोडून देतात. प्रयत्न करणे सोडून देतात. अनेकदा अशावेळी इगो आड येतो. नेमका पुढाकार घ्यायचा कोणी हाच संभ्रम नाते कायमचे तोडून टाकतो. त्यामुळे संवाद संपला की समजून जावं हे नातं संपलं आहे.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या खास टिप्स

ओढ संपणे

आपल्या समाजात नेहमी एक गोष्ट बिंबवली जाते की, शारीरिक प्रेमापेक्षा मानसिक प्रेम हे महत्त्वाचे आहे पण असं नसतं. दोन्हींचा समतोल राखता आला पाहिजे. ज्या नात्यात शारीरिक जवळीक नसेल, शारीरिक सुख नसेल ते नातं मुळातच नातं म्हणता येणार नाही. कारण ओढ तेव्हाच निर्माण होते जेव्हा एकमेकांकडून सुख मिळते. अनेकदा बऱ्याच कारणांमुळे कुठेतरी या जवळकीमध्ये खंड पडतो आणि मग हळूहळू हा खंड मोठा होऊ लागतो व एक वेळ अशी येते की दुसऱ्या कोणाच्या तरी सहवासाची गरज भासू लागते. ही स्थिती सुद्धा दर्शवते की नाते संपलेले आहे.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips: तुमचं रिलेशनशिप Perfect आहे का?

वागणुकीतील बदल

वागणूक ही अशी गोष्ट आहे ज्यामधून व्यक्तीबाबत अनेक गोष्टी कळतात. एक हेल्दी रिलेशनशिप ती असते ज्यात पार्टनर्स रोज एकमेकांसोबत हसून खेळून बोलतात, ऑफिसला जाताना एकमेकांना गुड बाय करतात. एकमेकांची दिवसभर विचारपूस करतात, काळजी घेतात. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि दोन अनोळखी लोकं एकमेकांसोबत राहत आहेत. त्याप्रमाणे राहू लागतात तेव्हा ती वागणूक दाखवून देते की नात्यामध्ये काहीच उरलेले नाही.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship tips : डेटवर इंप्रेशन डाऊन करायचं नसेल तर या चुका टाळा

अजिबात न भांडणे

आपण बऱ्याचदा म्हणतो की ज्या नात्यात भांडणेच होत नाहीत ते नाते किती मस्त असेल. पण मंडळी असे अजिबात नसते. ज्या नात्यात भांडणे होत नाहीत ते नाते चांगले असेलच असेही नाही. स्वत: जाणकार सुद्धा सांगतात की ज्या नात्यात भांडणेच होत नसतील अशा कपल्समध्ये एकमेकांविषयी ओढच नसते. ते आपल्या पार्टनरला हवे ते करू देतात आणि याचाच अर्थ असा की त्यांना नात्याची काहीच काळजी राहिलेली नाही. त्यांनी नातं सोडून दिले आहे. त्यामुळे लक्षात घ्या की थोडे तरी भांड्याला भांडे लागले पाहिजे. यातून एकमेकांविषयीचे प्रेम अधिक वाढते.

Relationship Tips : 'या' 5 गोष्टी सांगतात तुमची लगीन गाठ सैल झाली, वेळीच सावध व्हा
Relationship Tips: योग्य जोडीदार हवाय? 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा

अफेयर असणे

लग्नाचा जोडीदार असताना सुद्धा दुसऱ्या व्यक्तीबाबत आकर्षण निर्माण होणे किंवा दुसऱ्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटू लागणे म्हणजेच नात्यामध्ये रस नसणे होय. जेव्हा असे वाटू लागते आणि लग्नापेक्षा अफेअरला जास्त महत्त्व दिले जाते तेव्हा ते नाते कधीच ठीक होणार नसते. कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ते दोन कपल्स पुन्हा एकत्र येण्याची शक्यताअगदीच शून्य असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.