Mental Health : मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज करा ‘या’ गोष्टी

आजकाल या मानसिक आरोग्याविषयी सोशल मीडियावर किंवा इतर अनेक माध्यमांवर सखोलपणे चर्चा होताना दिसते. या विषयाबद्दल एवढी माहिती उपलब्ध असूनही मानसिक आरोग्याच्या समस्या कमी होताना काही दिसत नाही.
mental health
mental healthesakal
Updated on

Mental Health : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु, आजकाल या मानसिक आरोग्याविषयी सोशल मीडियावर किंवा इतर अनेक माध्यमांवर सखोलपणे चर्चा होताना दिसते. या विषयाबद्दल एवढी माहिती उपलब्ध असूनही मानसिक आरोग्याच्या समस्या कमी होताना काही दिसत नाही. (Tips to maintain good mental health)

या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक आरोग्याबाबतचा आपला अव्यवहारिक दृष्टिकोन हे आहे. ज्यामुळे, या गोष्टी सोप्या होण्याऐवजी आणखी गुंतागुतींच्या होतात. मात्र, आपले विचार, आपली जीवनशैली आणि आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या सवयींचा आपल्या मानसिक आरोग्यावर खऱ्या अर्थाने परिणाम होतो. हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे.

त्यामुळे, या परिस्थितीमध्ये आपण काही छोट्या-मोठ्या गोष्टी, काही सवयींचा अवलंब केल्यास आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात त्या गोष्टींबद्दल.

mental health
Yoga for Mental Health : नव्या वर्षाची निरोगी आणि आनंदी सुरूवात करण्यासाठी ‘या’ योगासनांची घ्या मदत

नवीन गोष्टी शिका

जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो, तेव्हा आपल्या मनात आत्मविश्वासाची भावना तयार होते. विशेष म्हणजे हा आत्मविश्वास तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यास मदत करतो. तुमच्यात एक नवा उत्साह संचारतो. त्यामुळे, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही सतत नवीन गोष्टी शिकत रहायला हवे. एखादी नवीन कला, क्रिएटिव्हीटी किंवा एखादी भाषा तुम्ही शिकायला हवी. (Learn new things)

स्वत:साठी वेळ काढा

स्वत:साठी वेळ काढणे, हे अतिशय महत्वाचे आहे. जर तुम्ही स्वत:ला वेळ दिला नाही तर मग तुमच्या शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, या सर्व धकाधकीमध्ये स्वत:साठी वेळ काढणे हे फार महत्वाचे आहे. (Take time for yourself)

निसर्गासोबत वेळ घालवा

सोशल मीडियाच्या या काळात आपण सर्वजण आभासी जगात एवढे हरवलो आहोत की, आपल्याला खऱ्या जगाचा विसर पडला आहे. आपल्यातील अनेकांचा सर्वाधीक वेळ हा मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि ऑनलाईन गेम्स खेळण्यात जात आहे. त्यामुळे, या गोष्टींचे जणू व्यसन लागत चालले आहे. यामुळे, मानसिक ताण-तणाव वाढत आहे. (Spend time with nature)

त्यामुळे, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही निसर्गासोबत वेळ घालवणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, तुमच्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून किंवा सुट्टीच्या दिवशी निसर्गामध्ये वेळ घालवायला अजिबात विसरू नका.

mental health
Mental Health : दिवसभरातील थकवा आणि ताण-तणाव दूर करण्यासाठी 'या' थेरपींची घ्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.