Health Care : सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय खाता किंवा पिता? याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक जण आपल्या दिवसाची सुरूवात चहा-कॉफीने करतात. हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
त्याऐवजी जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास कोमट पाणी प्यायले तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात सकाळी चहा-कॉफीच्या ऐवजी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. असे केल्याने आपल्या आतड्यांमध्ये अडकलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
तसेच, आपली पचनक्रिया सुरळीत राहते. या कोमट पाण्याला उत्तम डिटॉक्स ड्रिंक्स बनवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबू आणि मध घालून पिऊ शकता. यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि शरीर डिटॉक्स होते.
जर तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे हा त्यावर रामबाण उपाय ठरू शकतो. सकाळी चहा किंवा कॉफी पिणे शक्यतो टाळा.
त्याऐवजी सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिण्यास सुरूवात करा. यामुळे, तुमची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच तुमचे वजन देखील कमी होईल. शिवाय, शरीराची चयापचय क्रिया देखील सुरळीत राहील.
आपल्या आसपासचे वातावरण बदलले की, लगेच सर्दी-खोकल्याची समस्या सुरू होते. खास करून थंडीच्या दिवसांमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. विशेष करून लहान मुले किंवा वयोवृद्धांना या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सकाळी कोमट पाणी प्यायले तर तुमची सर्दी-खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच तुम्ही कोमट पाण्यात मीठ आणि चिमूटभर हळद मिसळून सकाळी गुळण्या करू शकता. यामुळे, तुमच्या घशाला आराम मिळेल आणि कफची समस्येपासून सुटका मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.