Best Places to Visit : जानेवारी महिन्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? मग, ‘ही’ ठिकाणे आहेत बेस्ट

या जानेवारी महिन्यात फिरण्याची मजा काही औरच असते. या महिन्यात कडाक्याची थंडी देखील सर्वत्र असते. त्यामुळे, या वातावरणात फिरायला जायला अनेकांना आवडते.
Best Places to Visit
Best Places to Visitesakal
Updated on

Best Places to Visit : नुकतीच नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. या जानेवारी महिन्यात फिरण्याची मजा काही औरच असते. या महिन्यात कडाक्याची थंडी देखील सर्वत्र असते. त्यामुळे, या वातावरणात फिरायला जायला अनेकांना आवडते.

या महिन्यात फिरायला कुठे जायचे? असा जर तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या महिन्यात मोठा लाँग विकेंड येत आहे. हा लाँग विकेंड २६ जानेवारी ते २८ जानेवारीच्या दरम्यान येत आहे.

त्यामुळे, या ३ दिवसांच्या सुट्टीमध्ये तुम्ही भारतातील काही राज्यांमधील सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ शकता किंवा एखादी छोटी ट्रीप करू शकता. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही सुप्रसिद्ध ठिकाणांबदद्ल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला फिरायला जाऊ शकता.

Best Places to Visit
2024 long weekend : नवीन वर्षात असणार भरगच्च लाँग विकेंड्स, आतापासूनच करा फिरायला जाण्याचे प्लॅनिंग

रणथंबोर नॅशनल पार्क (राजस्थान)

राजस्थानमधील रणथंबोर हे नॅशनल पार्क पर्यटकांच्या आवडीचे आहे. या नॅशनल पार्कची लोकप्रियता इतकी आहे की, पर्यटकांची वर्षभर येथे गर्दी असते. हिवाळ्यात तर येथील परिसर नयनरम्य दिसतो. त्यामुळे, जानेवारी महिन्यातील या लाँग विकेंडला तुम्ही या नॅशनल पार्कला नक्कीच भेट द्यायला जाऊ शकता.

अल्मोडा (उत्तराखंड)

भारतातील उत्तराथंड हे राज्य हिलस्टेशन्सचा मोठा बालेकिल्ला आहे, अस म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या राज्यांमध्ये हिलस्टेशन्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे हिलस्टेशन्स पर्यटकांच्या आवडीचे आहेत.

अल्मोडा (उत्तराखंड)
अल्मोडा (उत्तराखंड)

तुम्हाला हिलस्टेशन पहायला आवडत असेल तर तुम्ही उत्तराखंड राज्यातील या अल्मोडा हिलस्टेशनला भेट द्यायला काहीच हरकत नाही. हिरवळ आणि दाट धुक्यांनी आच्छादलेला हा परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

या परिसरात तुम्ही जोरी पॉईंट, जोगेश्वर मंदिर, सूर्य मंदिर, बिनसार इत्यादी सुंदर ठिकाणे पाहू शकता. शिवाय, अल्मोडामध्ये तुम्ही शॉपिंग देखील करू शकता. येथील मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू मिळतात.

'ब्लू सिटी' जोधपूर

राजस्थान म्हटलं की तिथे जयपूर आणि जोधपूर ही दोन शहरे सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात. कारण, ही दोन्ही शहरे तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यामुळे आणि ठिकाणांमुळे प्रसिद्ध आहेत.

जोधपूर
जोधपूर

हिवाळ्यात येथील परिसर अधिक पाहण्यासारखा असतो. त्यामुळे, पर्यटकांची येथे वर्षभर गर्दी असते. तुम्ही ३-४ दिवसांची छोटी ट्रीप या शहरात नक्कीच एंजॉय करू शकता.

Best Places to Visit
Winter Travel Tips : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी हिलस्टेशनला जाताय? मग, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.