Health Care : हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे किवी, आजच करा आहारात समावेश

किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात या फळाचा जरूर समावेश करा.
Health Care
Health Careesakal
Updated on

Health Care : निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घातली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. मात्र, आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरूवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरते. या कामी किवी हे फळ तुमची मदत करू शकते. किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. आज आपण हिवाळ्यात किवी खाण्याचे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Health Care
Health Care : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे लव्हेंडर टी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हाडांना मिळते बळकटी

किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश आढळून येतो. एक कप किवीमध्ये साधारणपणे ६१.२ मिलीग्रॅम कॅल्शिअमचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते शिवाय, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

किवीमध्ये कॅल्शिअमसोबतच इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

शिवाय, थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा.

पचनक्षमता सुधारते

किवीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. शिवाय, किवीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहींसाठी देखील हे फळ फायदेशीर आहे.

फायबर्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायी ठरते. ज्यांची पचनक्षमता कमकुवत आहे किंवा, ज्यांना पोटाच्या समस्या आहेत. त्या लोकांनी आहारात किवीचा जरूर समावेश करावा.

Health Care
Benefits Of Dragon Fruit : 'ड्रॅगन फ्रुट' नेमकं काय आहे? एकाच फळातून मिळतात भरपूर फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.