Indian Traditions: जेवायला भारतीय बैठकीत बसण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे!

जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपण सामान्यत: मांडी घालून बसतो यालाच सुखासन किंवा पद्मासन म्हणून देखील ओळखले जाते.
These are the tremendous benefits of sitting in an Indian style for a meal
These are the tremendous benefits of sitting in an Indian style for a mealEsakal
Updated on

मांडी घालून जमिनीवर जेवणाची पद्धत खूप अद्भुत आहे. ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे.मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे आहेत. भारताव्यतिरिक्त, अनेक पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियाई संस्कृतीमध्ये देखील मांडी घालून जेवण्याची परंपरा आहे.

जमिनीवर बसून खाण्याची जुनी भारतीय पद्धत सर्व वैज्ञानिक आणि योग्य खाण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपण सामान्यत: मांडी घालून बसतो यालाच सुखासन किंवा पद्मासन म्हणून देखील ओळखले जाते.

जमिनीवर बसणे आणि नंतर उठून ताट ठेवणे किंवा जेवण हवं असल्यास मध्येच उठणे यामुळे शरीराची सुरळीत हालचाल होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि तुमचे मन आराम आणि शांत करण्यात प्रभावी राहते. महत्वाचं म्हणजे अशा बैठकीत जेवायला बसल्यामुळे तुम्ही शरीराला आवश्यक तेवढेच जेवण घेता.

These are the tremendous benefits of sitting in an Indian style for a meal
Winter Recipe: वजन कमी करणारा आरोग्यवर्धक चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवायचा?

मांडी घालून जेवायला बसल्यामुळे पचनास मदत करते आणि पाचक रसांचे नियमन वाढवते जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवते. हे पोटाच्या स्नायूंना देखील चालना देते जे पोटातील आम्ल वाढविण्यास मदत करते. अशा पद्धतीने जेवायला बसल्यामुळे तुम्हाला फायदाच होतो.

These are the tremendous benefits of sitting in an Indian style for a meal
Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला हेल्दी ठेवणारा स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स कसा तयार करायचा?

आपले हृदय, शरीर, पचन क्रिया व रक्त संचार योग्य प्रकारे चालत असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपण जास्त काळासाठी निरोगी राहतो.

आपले आयुर्मान वाढते. हे काही जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे आहेत यामुळे आपल्या शरीरास खूप फायदा होईल आणि हे फक्त आयुर्वेद सांगत नाही तर विज्ञानात देखील सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.