Ayurvedic Tips for Children : लहान मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

आयुर्वेदामध्ये लहान मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि त्यांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
Ayurvedic Tips for Children
Ayurvedic Tips for Childrenesakal
Updated on

Ayurvedic Tips for Children : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात घर आणि ऑफिसमध्ये काम करताना बऱ्याचदा दमायला होतं. आहार, व्यायाम आणि मेडिटेशन या गोष्टींसाठी वेळ काढला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे, प्रौढांसोबतच लहान मुलांनी ही व्यायाम करणे गरजेचे आहे.

खेळण्याच्या माध्यमातून अनेक मुलांचा व्यायाम होतो. मात्र, रोज खेळणं होतचं असे नाही. माहिती आणि मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे लहान मुले देखील एकलकोंडी होत चालली आहेत. त्यांची एकाग्रता कमी होत चालली आहे. त्यामुळे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत.

आयुर्वेदामध्ये लहान मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि त्यांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स सांगितल्या आहेत. कोणत्या आहेत या आयुर्वेदिक टिप्स ? चला तर मग जाणून घेऊयात.

शंखपुष्पी

शंखपुष्पी ही आय़ुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा आणि औषधी गुणधर्मांचा समावेश आढळतो. या वनसप्तीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील केला जातो.

तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर आहे. तसेच, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. या वनस्पतीचा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा शंखपुष्पी एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकता.

Ayurvedic Tips for Children
Parents Teacher Meeting : ‘पॅरेंट्स टीचर मिटिंग’ मध्ये मुलांसमोर बोलताना पालकांनी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या ‘या’ गोष्टी

ब्राह्मी

ब्राह्मी ही सर्वात प्राचीन वनस्पती आहे. ब्रेन टॉनिक म्हणून या वनस्पतीला ओळखले जाते. अनेक औषधांमध्ये या वनस्पतीचा आवर्जून वापर केला जातो. लहान मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा आवर्जून वापर केला जातो.

या वनस्पतीची ब्राह्मी पावडर मिळते. ही पावडर दूधात किंवा पाण्यात मिसळून याचे सेवन केले जाऊ शकते. याचे नियमित सेवन केल्याने लहान मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत मिळू शकते.

अश्वगंधा

आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला सर्वात प्राचीन आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. अनेक औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केलेला आढळून येतो. अश्वगंधा या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात.

मानसिक आरोग्यासोबत, एकाग्रता वाढवण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी ही वनस्पती लाभदायी ठरते. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना ही वनस्पती फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Ayurvedic Tips for Children
Nutrition Rich Foods: मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं योग्य पोषण; ‘हे’ खाद्यपदार्थ करतील मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()