आपल्या देशात प्रेम या भावनेपेक्षा लग्नाला अधिक महत्व आहे. लग्न हे वयात व्हाव असंही अनेकांच म्हणणं असतं. त्यामुळं मुलगा किंवा मुलगी यांचे योग्य वयात लग्न व्हावे असा पालकांचाही अट्टहास असतो.
एखाद्या मुलीचं वय तीसपेक्षा जास्त असेल आणि तिचं लग्न झालं नाही म्हणजे त्या मुलीमध्ये काहीतरी खोट आहे, असं सामान्यपणे समजलं जातं.
सध्या मुला-मुलींना त्यांचं करिअर, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र्य असणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे अनेकजण तिशीनंतर लग्न करण्याचा विचार करतात. पण, तिशीनंतर लग्न झालं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं
लग्नासाठी जी परिपक्वता लागते ती वयाच्या २१ वर्षांनंतर तुमच्यात येते. त्यामुळे सरकारने लग्नाचे वय २१ वर्षे निश्चित केले आहे. पण, नात्यात प्रत्येकाला १०० टक्के योग्य जोडीदार मिळतोच असं नाही. तुम्ही जर तिशीच्या आत लग्न केले तर त्याचे पाच चांगले फायदे आहेत.
तिशीच्या आत लग्न केल्याने मुलींना नवरा आणि सासरच्या लोकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. सासू- सासरे सुनेला मुलीप्रमाणे समजून घेतात. तसंच, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असतो.
कधी कधी सासू सुनेला स्वयंपाक करायला शिकवते. म्हणजेच तुम्हाला नव्या गोष्टी शिकता येऊ शकतात.
(It's the ideal time to get to know one another.)
रोमान्स टिकेल दिर्घकाळ
तिशीच्या आत लग्न केल्याने वैयक्तिक आयुष्याबरोबरच रोमान्सही दिर्घकाळ टिकेल. अशी जोडपी दिर्घकाळ तरूण राहतात. तसेच ती एकमेकांसोबत खूप रोमँटिक असतात.
(The romance will last a long time.)
कमी वयात तुमचे लग्न झाल्याने घरातलेही लवकर मुलं होऊ देण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. वय जास्त असेल तर वर्षाच्या आत मुलं होत नाही म्हणून अनेकजण टोमणे मारतात.
त्यामुळे त्रास होतो तो वेगळाच. उलट, कमी वयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना नेहमीच मुलांना आरामात जन्म देण्याचा आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो.
(There is less family pressure to have children.)
कमी वयात लग्न केल्याने मुला-मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. मुलींची मानसिकता आणि परिपक्वता पातळी 21 ते 25 वर्षे वयाच्या मुलांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे मुलींना गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतात.
(A sense of responsibility.)
उशीरा लग्न केले की मुलींना काहीवेळा करिअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. पण तुम्ही योग्य वयात लग्न केले तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो. तुम्ही तुमचे काम आणि करिअर पुढे नेऊ शकता. तसेच पती-पत्नी मिळून कोणताही व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करू शकता.
(Time to become financially independent.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.