International Trip : पहिल्यांदाच परदेश वारी करताय? मग, फॉलो करा 'या' टिप्स

नव्या देशात प्रवास करणे, तेथील लोकांना भेटणे, त्या देशाचा इतिहास-खाद्यसंस्कृती जाणून घेणे आणि तो देश एक्सप्लोअर करणे हे खूपच रोमांचक आहे.
International Trip
International Tripesakal
Updated on

International Trip : अनेकांना फिरायला जायला प्रचंड आवडते.आपल्यातील क्वचितच असा कोणी असेल की, ज्याला परदेश दौऱ्यावर जायचे नसेल. आयुष्यात एकदा तरी विदेशात फिरायला जावे, असे आपल्या सर्वांनाच वाटते. आंतरराष्ट्रीय सहलीवर जाणे, हे खूप रोमांचक असू शकते.

नव्या देशात प्रवास करणे, तिथल्या नव्या लोकांना भेटणे, तिथला इतिहास-खाद्यसंस्कृती जाणून घेणे आणि आणि तो देश एक्सप्लोअर करणे हे खूपच रोमांचक आहे. या परदेशातील ट्रिपमुळे तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल. शिवाय, हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल.

मात्र, अशा परदेश वारीला जाण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाच्या गोष्टींची खास काळजी घ्यायला हवी. ही काळजी जर तुम्ही घेतली नाही, तर प्रवासाला गेल्यावर काही चुका घडू शकतात. या चुका टाळण्यासाठी तुम्ही परदेशात फिरायला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

International Trip
Indian Islands Travel : केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील ‘ही’ बेटे पर्यटनासाठी आहेत खास, नक्की द्या भेट

तुमचे बजेट सेट करा

परदेशात फिरायला जाण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही तुमचे बजेट सेट करणे हे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून सहलीवरून आल्यानंतर ही तुमच्याकडे काही बचत शिल्लक रहायला हवी. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला पैशांची काही अडचण येऊ नये.

कोणत्याही देशात फिरायला जाण्यापूर्वी आधी तुमच्या बजेटचे नियोजन करा. फ्लाईट तिकिट, व्हिसा, आरोग्य आणि प्रवास विमा इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन तुमचे बजेट बनवा. या शिवाय तुमची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय कशी असणार आहे? याची माहिती तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरकडून किंवा ट्रॅव्हल एजंटकडून घ्या.

प्री बुकिंग करा

तुमच्यासारखे इतके अनेक जण परदेशात फिरायला जातात. त्यामुळे, तेथील हॉटेल्सबद्दल माहिती घेऊन तुमचे प्री-बुकिंग तुम्ही करू शकता. त्यामुळे, तिथे गेल्यावर तुम्हाला हॉटेल शोधायला त्रास होणार नाही. यासोबतच तुमच्या फ्लाईटचे प्री-बुकिंग करायला विसरू नका.

स्मार्ट पॅकिंग करा

परदेशात फिरायला जाण्यापूर्वी मस्त पॅकिंग करा. पॅकिंग करताना जास्त गोष्टींचे पॅकिंग करणे टाळा. जे आवश्यक आहे, तितक्याच गोष्टींचे पॅकिंग करा. जर तुम्ही अनावश्यक सामान घेतले, तर त्याचा भार तुम्हालाच उचलावा लागणार आहे. हे लक्षात असुद्या. या सोबतच तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तेथील संस्कृती आणि तिथल्या वातावरणानुसार तुमच्या कपड्यांचे पॅकिंग करा.

International Trip
Travel Tips : ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, प्रवासाचा आनंद आणखी वाढेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.