Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

हिवाळ्यात कपड्यांपासून ते आहारापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये बदल केला जातो.
Winter Fashion Tips
Winter Fashion Tipsesakal
Updated on

Winter Fashion Tips : हिवाळ्याला सुरूवात झाली की, आपण आरोग्याची खास काळजी घेतो. या दिवसांमध्ये आपला आहार देखील बदलतो. थोडक्यात काय तर, कपड्यांपासून ते आहारापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये बदल केला जातो.

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा स्टायलिश दिसण्याच्या नादामध्ये आपण थंडीमुळे आजारी देखील पडतो. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये थंडीमुळे आजारी न पडता आपण आकर्षक लूक कसा करू शकतो. त्याकडे लक्ष द्यायला हवे.

यासाठी तुम्ही काही सोप्या स्टायलिश टीप्सची मदत नक्कीच घेऊ शकता. आज आम्ही अशाच काही सोप्या स्टायलिश टीप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही हिवाळ्यात ही तुमचा लूक स्टायलिश करू शकता.

Winter Fashion Tips
Lehenga Tips : संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ खास टीप्स

सूटला द्या नवा लूक

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक जण जीन्स-टॉप, स्वेटर्स, जर्किंग्स घालतात. मात्र, सतत हे ऑप्शन्स ट्राय केल्यामुळे बोअर होते. परंतु, जर तुम्हाला सूट घालायला आवडत असेल तर, तुम्ही डिझायनर वुलनचा दुपट्टा किंवा त्यावर स्टायलिश शाल कॅरी करू शकता.

यामुळे, तुमच्या लूकला वेगळा कूल टच येईल. त्यामुळे, सूटमध्ये ही तुमचा लूक स्टायलिश दिसेल.

स्कार्फ असा करा स्टाईल

अनेक मुलींना थंडीच्या दिवसांमध्ये स्कार्फ कॅरी करायला आवडते. या स्कार्फला ही तुम्ही स्टायलिश लूक देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही खास पद्धतींचा अवलंब करायला हवा.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या केसांमध्ये स्कार्फ गुंडाळू शकता. यामुळे, तुमच्या स्टाईलिश लूकला चारचॉंद लागतील यात काही शंका नाही. त्यासोबतच, तुम्ही तुमच्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळून किंवा मागे बांधून तुमच्या स्टाईलला वेगळा लूक देऊ शकता.

बूटची करा अशी निवड

हिवाळ्यात आवर्जून शूज किंवा बूट्स घातले जातात. कारण, यामुळे, पायांना थंडी वाजत नाही आणि आराम मिळतो. त्यामुळे, विविध प्रकारचे बूट्स, शूज इत्यादी पर्यायांचा विचार केला जातो.

आता थंडीच्या दिवसांमध्ये बूटची निवड करताना तुमच्या आऊटफीट्सचा जरूर विचार करा. तुमच्याकडे जर लॉंग कोट किंवा स्कर्ट असेल तर त्याच्यासोबत हाय बूट्स, अ‍ॅंकल लेंन्थ बूट्स किंवा थाय हाय बूट्स ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ट्राय करू शकता.

आता, या बूट्ससोबत तुम्ही लेगिंग्स किंवा फिटींगच्या जींन्स ट्राय करू शकता. यामुळे, तुमच्या लूकला छान ग्लॅमरस लूक मिळण्यास मदत होईल.

Winter Fashion Tips
Fashion Tips : साडी नेसताना चापूनचोपून निऱ्या घालण्याची झटपट ट्रिक; फिगरही दिसेल चांगली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.