Foods For Glowing Skin : ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

योग्य आणि संतुलित खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्वचा चमकदार दिसू शकते.
Foods For Glowing Skin
Foods For Glowing Skinesakal
Updated on

Foods For Glowing Skin : चेहरा आकर्षक आणि चमकदार दिसण्यासाठी आपण नाना प्रकराचे उपाय करतो. घरगुती उपाय करतो आणि विविध प्रकारच्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सची मदत घेतो. या सर्व उपायांसोबतच आपला आहार देखील तितकाच महत्वाचा आहे, हे आपण अनेकदा विसरतो.

सकस आहार हा आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील तितकाच फायदेशीर असतो. हे आपण अनेकदा विसरतो. योग्य आणि संतुलित खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्वचा चमकदार दिसू शकते. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबदद्ल जाणून घेणार आहोत, जे आपली त्वचा ग्लोईंग दिसण्यासाठी फायदेशीर ठरतात.

गाजर

गाजरामध्ये अनेक प्रकारचे पोषकघटक समाविष्ट आहेत. व्हिटॅमिन A  हे जीवनसत्व गाजरामध्ये प्रामुख्याने आढळते. या व्हिटॅमिनमुळे त्वचा घट्ट होण्यास मदत मिळते. शिवाय, त्वचेतील अतिरिक्त तेलाचे प्रमाण कमी होते.

चेहऱ्यावरील पुरळ, मुरूम आणि डागांची समस्या दूर करण्यासाठी गाजर अतिशय फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन A साठी गाजर हा सर्वोत्तम पर्याय आहे. गाजराचा सॅलेडच्या रूपात तुम्ही आहारात समावेश करू शकता, यासोबतच सकाळी गाजराचा रस पिणे फायदेशीर मानले जाते.

Foods For Glowing Skin
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खायला सगळ्यांनाच आवडते. डार्क चॉकलेटला स्ट्रेस बूस्टर असे ही म्हटले जाते. त्वचेतील कोलेजनचे विघटन रोखण्यास डार्क चॉकलेट मदत करते. तसेच, त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

डार्क चॉकलेटमध्ये झिंक आणि लोहाचे प्रमाण भरपूर आढळून येते, ज्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. त्वचेसोबतच केसांसाठी देखील डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. महिलांनी त्यांच्या डेली रूटीनमध्ये डार्क चॉकलेटचा जरूर समावेश करावा.

Foods For Glowing Skin
Tomato for Skin : मऊ आणि चमकदार त्वचा हवी आहे ? मग, टोमॅटोपासून बनवा ‘हे’ होममेड स्क्रब्स

बदाम

केसांसाठी आणि चमकदार त्वचेसाठी बदाम हे फायदेशीर आहे. बदामाच्या तेलाचा उपयोग हा केसांच्या वाढीसाठी देखील केला जातो. केसांसोबतच बदाम त्वचेसाठी लाभदायी आहे. बदाम नियमित खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम राहण्यास मदत मिळते.

बदामामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ई मुळे त्वचा ग्लो करण्यास मदत होते. व्हिटॅमिन्ससोबतच बदामामध्ये मॅग्नेशिअमचे मुबलक प्रमाण आढळून येते. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बदाम फायदेशीर मानले जाते.

Foods For Glowing Skin
Face Packs for Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?गुलाबजल आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

संत्र्याचा ज्यूस

संत्र्यामध्ये पोषकतत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या पोषकतत्वांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, पोटॅशिअम आणि फायबर्सचा संत्र्यामध्ये समावेश आढळून येतो. त्यामुळे, संत्रा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

संत्र्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते आणि आजारांपासून संरक्षण मिळते. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या संत्र्यामुळे त्वचा चमकदार दिसण्यास मदत मिळते. संत्र्याचे आरोग्याला जितके फायदे आहेत तितकेच फायदे त्वचेला देखील आहेत. त्यामुळे, तुमच्या आहारात संत्र्याचा आणि संत्रा ज्यूसचा नक्की समावेश करा.

Foods For Glowing Skin
Combination Skin Face packs : मिश्र त्वचेमुळे त्रस्त आहात ? कोरफड आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड फेसपॅक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()