Diet for PCOD: पीसीओडीमुळे वाढतंय वजन? कसा असावा तुमचा डाएट? जाणून घ्या

PCOD आणि पाळीच्या समस्या असणाऱ्या महिलांनी 'हा' आहार घ्या
Diet for PCOD: पीसीओडीमुळे वाढतंय वजन? कसा असावा तुमचा डाएट? जाणून घ्या
Updated on

PCOD ची समस्या आजकाल महिलांना खूप सतावत आहे. PCOD च्या समस्येमुळे स्नायू दुखणे, मूड स्विंग्स आणि अँझायटी यांसारखी अनेक लक्षणे दिसू लागतात. यावर मात करण्यासाठी आहार हेल्दी असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे महिलांची मासिक पाळी आणि फर्टिलिटी या दोन्हींवर परिणाम होतो. त्याची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी, आहारात योग्य बदल करणे खूप महत्वाचे आहे.

पिरीयड्स अनियमित होतात. वजन वाढतं, प्रेग्नेन्सीमध्ये अडचणी निर्माण होतात, गर्भधारणा होत नाही किंवा झाल्यास त्यात अनेक अडचणी उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्या PCOD मुळे निर्माण होणाच्या शक्यता आहेत. 

हार्मोनल असंतुलन कमी करण्यात आणि मासिक पाळी व्यवस्थापित करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्या PCOD ग्रस्त महिलांनी खाल्ल्याच पाहिजेत.

काजू

PCOD ग्रस्त महिलांनी त्यांच्या आहारात काजूचा समावेश करावा. तज्ज्ञांच्या मते, काजू हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात. काजूमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात असते, जे महिलांसाठी आवश्यक आहे.

Diet for PCOD: पीसीओडीमुळे वाढतंय वजन? कसा असावा तुमचा डाएट? जाणून घ्या
Health Care News : पोटात सतत गॅस आणि अपचन होत असेल तर हे पदार्थ कारणीभूत असू शकतात

बीटरूट

बीटरूट शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी संतुलित ठेवते. तसेच अशक्तपणा, अपचन आणि कमजोरी दूर करते. PCOD मध्ये महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची योग्य पातळी असणे खूप महत्वाचे आहे.

मनुका

PCOD मुळे महिलांना मासिक पाळी अनियमित, पीएमएस आणि मासिक पाळीत तीव्र वेदना होऊ शकतात. हे दूर करण्यासाठी मनुका हा रामबाण उपाय आहे. हे फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

ज्येष्ठमध 

PCOD मध्ये ज्येष्ठमध खूप फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे महिलांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करतो.

भोपळ्याच्या बिया

महिलांच्या अनेक समस्यांवर भोपळ्याच्या बिया रामबाण उपाय आहेत. हे केवळ हार्मोनल असंतुलन दूर करत नाही तर पचन देखील सुधारते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. तसेच पीसीओडीमुळे होणारे केस गळणे कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.