Home Remedies for white Hairs: पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? कांदा आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

केस पांढरे होणे या समस्येमागे एक ठराविक कारण सांगता येणार नाही, यामागे अनेक कारणे असू शकतात.
home remedies for white hairs
home remedies for white hairsesakal
Updated on

आजकाल केसांच्या समस्या या खूप कॉमन झाल्या आहेत. पुरूष असो किंवा महिला सर्वजण केसांच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. केस गळती, केस कोरडे होणे, केस पातळ होणे आणि केस पांढरे होणे अशा अनेक समस्यांसाठी बाजारातील उत्पादने किंवा घरगुती उपायांचा आपण वापर करतो.

केस पांढरे होणे या समस्येमागे एक ठराविक कारण सांगता येणार नाही. कारण, यामागे अनेक कारणे असू शकतात. बदललेली जीवनशैली, संतुलित आहाराचा अभाव, झोप न येणे, धूम्रपान करणे, फास्टफूडचे अतिसेवन, ताण-तणाव, प्रदूषण इत्यादी असंख्य कारणे केस पांढरे होण्यामागे असू शकतात.

केस पांढरे होण्याच्या समस्येवर आपण काही घरगुती उपाय करू शकतो. चला तर मग आज आपण अशाच काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

कांदा

केसगळतीसाठी, केसांच्या वाढीसाठी आणि केस पांढरे होण्याच्या समस्येवर कांद्याचा रस हा अतिशय गुणकारी आहे. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे, केसांच्या वाढीसाठी आणि केस पांढरे होण्याच्या समस्येवर कांदा फायदेशीर आहे.

केसांवर कांद्याचा रस लावण्यासाठी एक मोठा कांदा घ्या, तो बारीक कट करा किंवा तुम्ही कांदा किसून घेऊ शकता. आता त्याचा रस काढा.

कांद्याचा हा रस केसांच्या मुळांवर लावा. या कांद्याच्या रसाने तुम्ही केसांचा छान मसाज देखील करू शकता. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा नक्की करा.

home remedies for white hairs
Homemade hair packs : केसांच्या गळतीने त्रस्त आहात ? बटाटा आहे मदतीला ! घरच्या घरी बनवा ‘हे’ हेअर पॅक

दही आणि लिंबू

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. त्यामुळे, लिंबू हे केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. पांढऱ्या केसांच्या समस्येसाठी दही-लिंबाचे मिश्रण उत्तम प्रकारे काम करते.

३-४ चमचे दही घ्या त्यामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळांना लावा. आता केस १-२ तासांसाठी असेच ठेवा. त्यानंतर, केस धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २-३ वेळा हा उपाय अवश्य करा.

ब्लॅक टी

पांढऱ्या केसांचे प्रमाण कमी करण्यासाठी ब्लॅक टी अतिशय उपयुक्त आहे. हे कदाचित अनेकांना माहित नसेल. मात्र, ब्लॅक टी केसांच्या समस्येसाठी अतिशय लाभदायी आहे. ब्लॅक टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे केसांना त्याचा फायदा होतो.

केस गडद करण्यासाठी किंवा केसांना चमक आणण्यासाठी ब्लॅक टी गुणकारी आहे. ब्लॅक टी अर्थात कोऱ्या चहाचा उपाय करण्यासाठी, एक किंवा २ ग्लास पाणी उकळायला ठेवा. त्यात साधारण ८-१० चमचे चहापावडर घाला.

आता हे मिश्रण छान उकळू द्या. ते बऱ्यापैकी उकळ्यानंतर थंड होऊ द्या. त्यानंतर, केसांना शॅम्पू केल्यावर हे ब्लॅक टीचे पाणी केसांच्या मुळाशी लावा. २०-२५ मिनिटांनंतर केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून किमान २-३ वेळा नक्की करा.

home remedies for white hairs
Hair Fall : केस गळती रोखण्यासाठी ‘ही’ योगासने आहेत फायदेशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.