Skin Care Tips : हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. या दिवसांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप इत्यादी समस्या सुरू होतात. मात्र, या सगळ्या थंडीतील वातावरणाचा आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचा आणि केस दोन्ही कोरडे पडतात.
त्वचा कोरडी होण्याची समस्या होण्यासोबतच चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम येणे इत्यादी समस्या सुरू होतात. मग, यावर महागड्या क्रीम्स आणि लोशन्सचा वापर केला जातो. मात्र, या सगळ्याने तात्पुरता फरक पडतो. पुन्हा या समस्या उद्भवतात. हिवाळ्यातील त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.
घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्येपासून ते चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यापर्यंत मध आणि हळद महत्वाची भूमिका बजावतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी घटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील हळद अतिशय फायदेशीर आहे.
हळदप्रमाणेच मध देखील आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही हळद आणि मधाचा उपाय करू शकता. त्यासाठी अर्धा चमचा हळद घ्या. त्यामध्ये १ चमचा मध मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटानंतर चेहरा धुवा.
फ्लेव्होनॉईड्स आणि अँटिऑक्सिडेंट्सने युक्त असलेला ग्रीन टी आरोग्यासोबतच आपल्या त्वचेची देखील काळजी घेतो. ग्रीन टी मुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. ग्रीन टीमुळे नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची आणि इन्सुलिनची पातळी कमी होऊ शकते. या सोबतच ग्रीन टी मुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागांच्या समस्या दूर होतात.
ग्रीन टी सोबतच कडुलिंब देखील त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. ग्रीन टी आणि कडुलिंबाचा हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून घ्या. त्यानतंर, १ कप ग्रीन टी तयार करून घ्या. त्यानंतर, हा ग्रीन टी थंड होऊ द्या. ग्रीन टी थंड झाल्यानंतर त्यात कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.