Hair Care Tips : लांब आणि घनदाट केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे, लांब आणि घनदाट केसांची अपेक्षा किती तरी जणींनी सोडून दिली असेल.
खरे तर केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आजकाल केमिकलयुक्त प्रॉड्क्टसचा वाढलेला वापर आणि केसांवर केल्या जाणाऱ्या विविध हेअर ट्रीटमेंट्समुळे केस आणखी पातळ आणि खराब होत आहेत. त्यामुळे, या हेअर ट्रीटमेंटमुळे केस जरी तात्पुरते सुंदर दिसत असले तरी नंतर मात्र, ते अधिक खराब आणि पातळ दिसतात.
या सर्व गोष्टींमुळे केसांच्या समस्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, तुमचे केस जर खूपच पातळ झाले असतील तर यावर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. कोणते आहेत हे घरगुती उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.
शिकाकाईमुळे केसांची वाढ चांगली होते. शिकाकाईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के आणि व्हिटॅमीन डी आढळून येते. हे सर्व घटक केसांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे, शिकाकाई ही केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
रीठ्यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय लाभदायी आहेत. रीठ्यामुळे केसांना छान मजबूती मिळते. त्यामुळे, रीठा देखील केसांसाठी फायदेशीर आहे.
शिकाकाई आणि रीठ्याचा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये ४-५ चमचे किंवा तुमच्या अंदाजानुसार शिकाकाई पावडर आणि रिठ्याची पावडर मिक्स करा. यामध्ये पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्या.
आता ही पेस्ट केसांना लावा. त्यानंतर ३०-३५ मिनिटांनी केस धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या हेअरमास्कचा केसांवर वापर अवश्य करा. (Shikakai and Reetha)
रीठ्याप्रमाणेच दही देखील आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या केसांना पोषण देण्याचे काम करतात आणि केसांना मऊ बनवतात. यासोबतच केसांच्या वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम दही करते.
रीठा आणि दह्याचा हा उपाय करण्यासाठी एका बाऊलमध्ये ३ चमचे रीठा पावडर घ्या. या पावडरमध्ये २ चमचे दही घाला आणि लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर, ही पेस्ट केसांवर लावा आणि १५-२० मिनिटांनंतर केस धुवून टाका. (Reetha and Dahi)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.