Morning Walk Mistakes मॉर्निंग वॉकपूर्वी करू नका या 5 चुका, अन्यथा वाढतील शारीरिक समस्या

Common Morning Walk Mistakes: मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी काही चुका केल्यास फायद्यांऐवजी शरीराला नुकसानच होईल.
Morning Walk Mistakes News
Morning Walk Mistakes NewsSakal
Updated on

खाद्यपदार्थ अधिक प्रमाण खाणे : 

मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी अधिक प्रमाणात खाणे टाळावे. काही लोकांना सकाळच्या नाश्त्यात अधिक प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन करण्याची सवय असते. पण नाश्ता करून तुम्ही लगेचच मॉर्निंग वॉकला गेलात तर शरीर लवकरच थकण्याची शक्यता असते. 

Morning Walk Mistakes News
Weightloss Resolution : कडाक्याच्या थंडीत मॉर्निंग वॉक कशाला? घरातच कमी करा वजन

यामुळे मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी भिजवलेले बदाम, उकडलेले मूग असा हलक्या स्वरुपातील पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करावा. 

पाणी न पिणे : 

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी पाणी न पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी सकाळी उठून पाणी प्यावे. म्हणूनच मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी आठवणीने पाणी प्यावे. यामुळे केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशनच्या समस्येपासूनही बचाव होईल. 

Morning Walk Mistakes News
Walking Benefits : Morning Walk केल्याने खरंच काही फायदा होतो का?

चुकीचे फुटवेअर : 

मॉर्निंग वॉक करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचं असते. यामुळे आरोग्यास लाभ मिळतील. मॉर्निंग वॉकसाठी योग्य पद्धतीच्या फुटवेअरची निवड करणं अतिशय गरजेचं आहे. चुकीच्या फुटवेअरची निवड केल्यास गुडघेदुखी, स्नायूदुखी, पायांचे दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच वजनाने हलके असलेले फुटवेअर वापरावे. 

स्‍मॉगपासून करा संरक्षण : 

दम्याची समस्या असलेल्या रुग्णांनी धुळीचे वातावरण असताना मॉर्निंग वॉक करणे टाळावे. यामुळे श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान समस्या होणे तसंच अशी हवा फुफ्फुसांच्या आरोग्याकरिताही घातक असते. दम्याच्या रुग्णांनी मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी हवेची गुणवत्तेबद्दल नक्की माहिती जाणून घ्यावी. 

वॉर्मअप न करणे : 

वॉर्मअप न करताच मॉर्निंग वॉक करण्यास गेल्यास तर शारीरिक नुकसान होऊ शकते. कारण वॉर्मअप देखील एक प्रकारे व्यायामच आहे. वॉर्मअप केल्याने शरीराची व्यायाम करण्याची क्षमता वाढते आणि शारीरिक दुखापती होण्याचीही शक्यता कमी असते.   

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.