Nutrition Rich Foods: मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं योग्य पोषण; ‘हे’ खाद्यपदार्थ करतील मदत

लहान मुलांचा सर्वांगीण विकास होणे हे अतिशय महत्वाचे आहे.
Nutrition Rich Foods
Nutrition Rich Foodsesakal
Updated on

लहान मुलांचा सर्वांगीण विकास होणे हे अतिशय महत्वाचे आहे. जर त्यांचा हा सर्वांगीण विकास योग्य पद्धतीने झाला नाही, तर त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मुलांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांचे वजन आणि उंची योग्यरित्या वाढण्यावर पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

योग्य पोषण आणि आहाराला व्यायामाची योग्य जोड देऊन तुम्ही मुलांचा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीने करू शकता. कुपोषण ही समस्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्‍टण्टिंग हा कुपोषणाचा एक प्रकार आहे. जगभरात स्टण्टिंग या कुपोषणाच्या प्रकारामुळे असंख्य मूले पीडित आहेत.

अ‍ॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायाच्‍या Scientific & Medical Affairs चे संचालक डॉ. गणेश काढे यांनी कुपोषणाचा एक प्रकार असलेल्या स्‍टण्टिंगबाबत माहिती दिली आहे. काढे यांनी मुलांच्‍या सर्वांगीण विकासामध्‍ये महत्वपूर्ण असणाऱ्या संतुलित आहाराबद्दल ही माहिती सांगितली आहे.

ते सांगतात की, जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालामधून असे निदर्शनास आले आहे की, भारतात जगभरातील बालपणीच्या स्टण्टिंगने पीडित असलेल्या मूलांपैकी एक-तृतीयांश मूले आहेत आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे.

त्यामुळे, लहान मूलांचे योग्य पोषण आणि सर्वांगीण विकास होणे महत्वाचे आहे. या उलट जर अपुरा आहार, पौष्टिक घटकांची कमतरता असेल तर कुपोषणाची समस्या होऊ शकतो. मूलांचा योग्य प्रकारे सर्वांगिण विकास होण्यासाठी त्यांना संतुलित आहारातून पौष्टिक घटक मिळणे गरजेचे आहे. हे प्रमुख पौष्टिक घटक कोणते ?  आणि ते कशातून मिळतील ? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

मूलांच्या सर्वांगिण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे प्रमुख पौष्टिक घटक खालीलप्रमाणे

कॅल्शिअम

कॅल्शिअम हा घटक मूलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचा आहे. कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात. शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्‍धजन्‍य पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्या हे कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे, मुलांच्या आहारात या खाद्यपदार्थांचा अवश्य समावेश करा.

व्हिटॅमिन A

जंतू, संसर्गांविरोधात लढण्यासाठी आणि फुफ्फुसाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्हिटॅमिन A फायदेशीर ठरते. या व्हिटॅमिनमुळे डोळ्यांची दृष्टी उत्तम राहण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या, गाजर-टोमॅटो, संत्री, आंबा, पिवळी फळे, रताळे आणि मासे या खाद्यपदार्थांमधून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A मिळते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात अवश्य करा.

Nutrition Rich Foods
Nutrition Tips for Kids : वाढत्या तापमानात लहान मुलांना द्या हे ६ आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स

प्रथिने

शरिरातील पेशी, स्नायू आणि हार्मोन्सचे संतुलन योग्य प्रकारे राखण्यासाठी प्रथिनांची मदत होते. प्रथिनांनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मसूर, बीन्स, हरभरे, पनीर, टोफू, चिकन, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो.

झिंक

बालपणी मूलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावण्याचे काम झिंक करते. रोगप्रतिकारक पेशींना योग्य प्रकारे सहाय्य करण्याचे काम झिंक करते. झिंकने समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये हरभरे, मसूर, काजू-बदाम, गहू, तांदूळ आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो.

Nutrition Rich Foods
Children's Height : योग्य वयात मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांच्या आहाराबरोबरच या 2 गोष्टींची जोड महत्वाची

व्हिटॅमिन D

व्हिटॅमिन D हे सर्वाधिक प्रमाणात सूर्यप्रकाशापासून मिळते. या व्हिटॅमिनमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. साल्मन, मॅकरेल, सार्डिनेस हे मासे, दूध आणि विविध प्रकारची कडधान्ये यांमधून व्हिटॅमिन D भरपूर प्रमाणात मिळते.

Nutrition Rich Foods
Children Health: लहान मुलांचे पोट सतत खराब होते? मग ‘हे’ उपाय नक्की ट्राय करून बघा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()