Dark Circles : डोळ्यांखाली डार्क सर्कल्स वाढण्याचे कारण ठरतेय 'या' पोषकतत्वांची कमतरता

शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल तर डोळ्यांखाली डार्क सर्कल्सची समस्या वाढू शकते.
Dark Circles
Dark Circles esakal
Updated on

Dark Circles : आजकाल महिलांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. या डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याचा पूर्ण लूकच बदलून जातो. त्यामुळे, या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते.

साधारणपणे तणाव, चिंता, झोपेच्या समस्या आणि जागरण करणे, इत्यादी कारणांमुळे डार्क सर्कल्सची समस्या निर्माण होते, असे मानले जाते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की जर तुमच्या शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल तर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्सची समस्या वाढू शकते. कोणती आहेत ही पोषकतत्वे? ज्यामुळे, डार्क सर्कल्सची समस्या वाढते. चला तर मग जाणून घेऊयात.

लोहाची कमतरता

शरीरात लोहाची कमरता असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लोहामुळे शरीरात रक्त तयार होण्यास मदत होते. त्यामुळे, लोहयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

शरीरात जर लोहाची कमतरता असेल तर त्वचेला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी डोळ्यांच्या खाली काळ्या वर्तुळांची समस्या आणि त्वचेच्या इतर समस्या निर्माण होतात. डोळ्यांखालची त्वचा मूळातच नाजूक आणि पातळ असते. त्यामुळे, ती लवकर प्रभावित होते.

ही लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि काळ्या वर्तुळांची समस्या दूर करण्यासाठी आहारात राजमा,सुकामेवा, सोयाबिन्स आणि लोहयुक्त धान्यांचा आणि फळांचा समावेश करा. यामुळे, शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

Dark Circles
Skin Care Tips : प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ‘या’ स्किनकेअर टिप्स करा फॉलो

व्हिटॅमीन सी

शरीरात व्हिटॅमीन सी चे प्रमाण कमी असेल तर आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्या ही निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमीन सी च्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे, व्हिटॅमीन सी ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा, फळांचा आहारात समावेश करावा.

व्हिटॅमीन सी हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंन्ट्स आहे, जे कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. कोलेजन हे एक प्रकारचे प्रोटिन आहे ज्यामुळे, आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

जेव्हा व्हिटॅमीन सी ची शरीरात कमतरता निर्माण होते, तेव्हा कोलेजनचे उत्पादन देखील थांबते त्यामुळे, त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण देखील वाढते.

त्यामुळे, व्हिटॅमीन सी ची कमरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात, मोसंबी, स्ट्रॉबेरी, किवी इत्यादी फळांसोबत बटाटा, ब्रोकोली आणि कडधान्यांचा समावेश करा.

Dark Circles
Fish For Mental Health : मानसिक आरोग्यासाठी लाभदायी आहेत मासे, जाणून घ्या फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.