Skin care Tips : त्वचेशी संबंधित समस्या या आजकाल खूप कॉमन झाल्या आहेत. मात्र, काही परिस्थितींमध्ये आपण त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही व्यवस्थित काळजी नाही घेतली तर याचा त्वचेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिममध्ये गेल्यावर ही त्वचेची काळजी घेणे गरचेचे आहे. जिममध्ये वर्कआऊट केल्यानंतर त्वचेवर घाम, धूळ आणि Impurities जमा होतात. यासाठी तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. पोस्ट वर्कआऊटनंतर त्वचेची कशी काळजी घ्यावी? त्याच्या काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
वर्कआऊट केल्यानंतर चेहरा अवश्य धुवा. वर्कआऊट दरम्यान चेहऱ्यावर जमा झालेला घाम आणि बॅक्टेरिआ साफ करण्यासाठी चेहरा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. त्यामुळे, वर्कआऊट केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
यामुळे, त्वचेचे तापमान सामान्य पातळीवर लवकर येण्यास मदत होते. तसेच, आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे, वर्कआऊट केल्यानंतर चेहरा धुवायला अजिबात विसरू नका.
त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पाण्यामुळे, त्वचा तर हायड्रेटेड राहतेच, त्यासोबतच, त्वचेतील मऊपणा टिकून राहतो. त्यामुळे, त्वचेसोबतच शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी अवश्य प्या.
वर्कआऊट करताना आपल्याला घाम येतो. या घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. घाम आल्यावर आणि वर्कआऊट केल्यावर थकल्यासारखे वाटणे स्वभाविक आहे. त्यामुळे, शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पाणी अवश्य प्या.
वर्कआऊट केल्यानंतर अनेकांची त्वचा ही लालसर होते किंवा त्वेचवर लाल डाग पडतात. त्यामुळे, त्वचेतील हा लाससरपणा कमी करण्यासाठी बर्फाचा अवश्य वापर करा.
वर्कआऊट केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर, बर्फाचे २-३ तुकडे चेहऱ्यावर गोलाकार आकारात फिरवा. यामुळे, त्वचेतील लालसरपणा कमी होण्यास मदत होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.