Root Vegetables : आजकाल लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये लठ्ठपणाचा समावेश आहे. लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत.
मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिममध्ये वर्कआऊट करण्यापासून ते जॉगिंग करणे, चालणे, योगासने यांचा आधार घेताना दिसतात. मात्र, या सर्व गोष्टी नियमितपणे नाही केल्या, तर पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते. परंतु, केवळ व्यायाम करून वजन नियंत्रित करता येत नाही. त्यासाठी हेल्दी डाएट प्लॅन असणे, खूप आवश्यक आहे.
या हेल्दी डाएट प्लॅनमध्ये संतुलित आहार घेतला जातो. या संतुलित आहारामध्ये तुम्ही काही कंदमुळे असलेल्या भाज्यांचा समावेश करू शकता. या कंदमुळांच्या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कोणत्या आहेत या कंदमुळाच्या भाज्या? चला तर मग जाणून घेऊयात.
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, मुळ्याचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. मुळ्यामध्ये सर्वाधिक फायबर्स आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळे, मुळ्याचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते आणि फार काळ भूक देखील लागत नाही. इतकेच नव्हे तर मुळ्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.
बीटामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी खास करून बीटाचे सेवन केले जाते. यासोबतच शरीरातील रक्त वाढवण्यासाठी बीट फायेशीर आहे. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात बीटाचा समावेश करतात. बीटामध्ये विविध पोषकघटकांसोबतच फायबर्सचे देखील भरपूर प्रमाण आढळते, शिवाय कॅलरीज कमी असतात. त्यामुळे, याचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
बीटा कॅरोटिनयुक्त असलेले हे गाजर केवळ आपली दृष्टी सुधारत नाही, तर आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील गाजर फायदेशीर आहे. गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक प्रकारे गाजराचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. गाजराचे सॅलेड, सूप किंवा गाजराच्या ज्यूसचे सेवन देखील केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.